"आज ती खूश झाली असती...", बोनी कपूर यांनी पूर्ण केली श्रीदेवींची शेवटची इच्छा, शेअर केली भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:23 IST2026-03-20T13:21:48+5:302026-03-20T13:23:10+5:30
Boney kapoor: या फोटोसोबत त्यांनी श्रीदेवीचा फोटो सुद्धा एडिट केला आहे.

"आज ती खूश झाली असती...", बोनी कपूर यांनी पूर्ण केली श्रीदेवींची शेवटची इच्छा, शेअर केली भावुक पोस्ट
प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक बोनी कपूर अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा देत असतात. यात काही वेळा ते त्यांचे फोटो वा किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यावेळी सुद्धा त्यांनी एक फोटो पोस्ट करत श्रीदेवी यांच्याविषयी भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण केली आहे.
बोनी कपूर यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचा स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये बोनी कपूर यांचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या फोटोसोबत त्यांनी श्रीदेवीचा फोटो सुद्धा एडिट करुन अॅड केला आहे. त्यामुळे त्यांचा फोटो पाहून नेटकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत.
काय आहे बोनी कपूर यांची पोस्ट?
बोनी कपूर यांनी त्यांचं वजन प्रचंड घटवलं असून त्यांचा नवा अंदाज नेटकऱ्यांना पाहायला मिळतोय. त्यांनी त्यांच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो पोस्ट केला आहे. सोबतच त्यांनी दिलेलं कॅप्शन लक्षवेधी ठरत आहे. ''मला पूर्ण खात्री आहे. मला या रुपात पाहून श्री खूप खूश झाली असती'', असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.
बोनी कपूर यांनी पूर्ण केली पत्नीची इच्छा?
बोनी कपूर यांनी त्यांच्या फिटनेसवर लक्ष द्यावं अशी श्रीदेवींची कायम इच्छा होती. यासाठी त्या सतत त्यांच्या मागे तगादाही लावायच्या. अभिनेत्री जान्हवी कपूर हिने एका मुलाखतीमध्ये श्रीदेवींच्या या इच्छाविषयी सांगितलं होतं. ''माझ्या वडिलांनी त्यांच्या हेल्थवर लक्ष द्यावं. ती सतत त्यांना डाएट करण्यासाठी, वॉकिंग करण्यासाठी प्रोत्साहन द्यायची'', असं जान्हवीने म्हटलं होतं.
दरम्यान,बोनी कपूर यांनी त्यांचं वजन घटवल्यानंतर त्यांच्या लूक आणि स्टाइलमध्येही खूप बदल झाला आहे. परंतु, त्यांच्यातील हा बदल त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना श्रीदेवीची आठवण प्रकर्षाने जाणवत आहे. हे त्यांच्या पोस्टवरुन लक्षात येतं.