​दुबईमधील वर्तमानपत्राचा दावा, श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबत बोनी कपूर यांची चौकशी झालीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 10:53 IST2018-02-27T05:23:31+5:302018-02-27T10:53:31+5:30

श्रीदेवी यांच्या मृत्यूप्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. श्रीदेवी यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला आहे. श्रीदेवी यांनी निधनाच्या काही ...

Boney Kapoor has not been questioned about the death of Sridevi, the claim of a newspaper in Dubai | ​दुबईमधील वर्तमानपत्राचा दावा, श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबत बोनी कपूर यांची चौकशी झालीच नाही

​दुबईमधील वर्तमानपत्राचा दावा, श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबत बोनी कपूर यांची चौकशी झालीच नाही

रीदेवी यांच्या मृत्यूप्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. श्रीदेवी यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला आहे. श्रीदेवी यांनी निधनाच्या काही वेळ अगोदर मद्यप्राशन देखील केले होते. त्यांच्या शरीरात मद्याचे काही अंश मिळाले आहेत. श्रीदेवी यांचा मृत्यू हृद्यविकाराच्या धक्क्याने झाले असल्याच्या बातम्या येत होत्या. पण श्रीदेवी यांच्या मृत्यूची नोंद अपघाती मृत्यू अशी करण्यात आली आहे. श्रीदेवी यांचा मृत्यू पाण्यात बुडल्यामुळे झाला असल्याचे फॉरेन्सिक  अहवालात नमूद करण्यात आले आहे. 
श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर बोनी कपूर यांची पोलिसांनी काही तास चौकशी केली असल्याचे म्हटले जात होते. पण या बातम्या चुकीच्या असल्याचे दुबई येथील खलीज टाईम्स या वर्तमानपत्राचे म्हणणे आहे. या वर्तमानपत्राच्या बातमीनुसार बोनी कपूर यांना अद्याप तरी चौकशीसाठी पोलिसांनी बोलवले नाहीये. 
श्रीदेवी यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत.
श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. बालकलाकार म्हणून श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीत पाय ठेवला होता. त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात काम केले. १९६७ साली एका मल्याळम चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना केरळ सरकारने सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवले होते.
श्रीदेवी यांनी १९७८ ला सोलावा सावन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. बॉलिवूडमधील सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. त्याचबरोबर, श्रीदेवी यांना हिंदी, तमिळ, तेलुगू भाषांतील चित्रपटातील भूमिकांसाठी सहा वेळा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

Also Read : ​ही होती श्रीदेवी यांची अंतिम इच्छा

Web Title: Boney Kapoor has not been questioned about the death of Sridevi, the claim of a newspaper in Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.