"एक्स गर्लफ्रेंडला ५० लाख द्या", कोर्टाच्या 'त्या' निर्णयावर नीरू रंधावाची प्रतिक्रिया, म्हणाली, "अरमान कोहली..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 01:38 PM2023-07-18T13:38:51+5:302023-07-18T13:42:11+5:30

एक्स गर्लफ्रेंडला ५० लाख देण्याचे आदेश कोर्टाने अरमान कोहलीला दिले होते. त्यावर आता त्याची एक्स गर्लफ्रेंड नीरू रंधावाने प्रतिक्रिया दिली आहे.

bombay high court ordered armaan kohli to pay 50 lakhs to ex gf neeru randhawa commented | "एक्स गर्लफ्रेंडला ५० लाख द्या", कोर्टाच्या 'त्या' निर्णयावर नीरू रंधावाची प्रतिक्रिया, म्हणाली, "अरमान कोहली..."

"एक्स गर्लफ्रेंडला ५० लाख द्या", कोर्टाच्या 'त्या' निर्णयावर नीरू रंधावाची प्रतिक्रिया, म्हणाली, "अरमान कोहली..."

googlenewsNext

प्रसिद्ध अभिनेता अरमान कोहलीला काही दिवसांपूर्वी एक्स गर्लफ्रेंडला ५० लाख रुपये देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. फॅशन स्टायलिस्ट नीरू रंधावाने एक्स बॉयफ्रेंड अरमान कोहलीवर मारहाण केल्याचा आरोप केला होता.  जून २०१८मध्ये अरमानविरोधात नीरू रंधावाने पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर अरमानला पोलिसांकडून अटकही करण्यात आली होती. नीरू रंधावाने तक्रार मागे घेतल्यानंतर कोर्टाने एक कोटी देण्याचे आदेश दिले होते. तेव्हा अरमानने नीरू रंधावाला ५० लाख रुपये देत उर्वरित ५० लाखांचा चेक दिला होता. परंतु, तो चेक बाऊन्स झाल्याने पुन्हा नीरू रंधावाने न्यायालयात धाव घेतली होती. 

गेल्याच आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी अरमान कोहलीला एक्स गर्लफ्रेंड नीरू रंधावाला ५० लाख रुपये देण्याचे आदेश दिले. यानंतर आता नीरू रंधवाने प्रतिक्रिया दिली आहे. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "२०१८चं हे प्रकरण आहे. न्यायालयीन कारवाईला थोडा वेळ लागतो, हे मला मान्य आहे. पण, सत्याचा विजय झाला, याचा मला आनंद आहे. माझे बाकीचे पैसे देण्याचे आदेश न्यायालयाने त्याला दिले आहेत. नाहीतर त्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते."

"एवढी दुनियादारी बघितलेला माणूस...", संजय जाधव यांच्यासाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट

"मी एक ब्रिटिश नागरिक आहे. त्यामुळे लंडन आणि भारत हा प्रवास करणं मला शक्य नव्हतं. अरमानच्या कुटुंबीयांनी त्याला माफ करून तक्रार मागे घेण्याची मला विनंती केली होती. त्यांच्याकडून मला माफीपत्र देण्यात आलं होतं. एक कोटी देण्याचं मान्य केल्यानेच मी तक्रार मागे घेतली होती. त्याने दिलेले ५० लाखांचे चेक बाऊन्स झाले होते. माझ्याकडे न्यायालयात जाण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता," असंही पुढे नीरू रंधावा म्हणाली. 

"NCP मध्ये कधीच फूट पडली नव्हती, हे सगळं बॉसच्या...", प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत

अरमान कोहली आणि नीरू रंधावा २०१५ साली एका कॉमन फ्रेंडद्वारे पहिल्यांदा भेटले होते. 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटात काम करण्यासाठी नीरूने अरमान कोहलीला ऑफर दिली होती. "मी मुंबईत कोणालाच ओळखत नव्हते. त्यामुळे मी अरमानच्या घरी राहत होते. त्यादरम्यान आमच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. आम्ही एकमेकांना भेटायचो. पण, शारीरिक हिंसेमुळे आमच्या नात्यात दुरावा आला होता. एकदा त्याने मला मारहाण केल्यानंतर मला रुग्णालयात भरती व्हावं लागलं होतं," असंही नीरू रंधावाने सांगितलं. 
 

Web Title: bombay high court ordered armaan kohli to pay 50 lakhs to ex gf neeru randhawa commented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.