बोमन इराणींकडून जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा; बिग बींसाठी शेअर केला खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 19:48 IST2023-10-11T19:47:51+5:302023-10-11T19:48:15+5:30

अभिनेते बोमन इराणी यांनी देखील बिग बींसाठी एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Boman Irani Birthday Wishes to Best Friend Big B video | बोमन इराणींकडून जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा; बिग बींसाठी शेअर केला खास व्हिडीओ

बोमन इराणींकडून जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा; बिग बींसाठी शेअर केला खास व्हिडीओ

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे शहंशाह म्हटले जाते. अमिताभ बच्चन आज त्यांचा 81 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास प्रसंगी चाहत्यांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली होती. तर बी-टाऊनचे सर्व स्टार्स सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यातच अभिनेते बोमन इराणी यांनी देखील बिग बींसाठी एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे.

अभिनेते बोमन इराणी यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं की,  " मला केबीसीचा फोन आला आणि वाढदिवसासाठी खास व्हिडीओ देण्यास सांगितलं. मी त्यांना किती मिनिटांचा व्हिडीओ लागेल असं विचारलं. तर त्यांनी ४५ सेंकदाचा व्हिडीओ द्या म्हटलं. बच्चन साहेबांवर मी ४५ सेंकदात काय बोलणार.  तुम्ही केवळ माझ्या पिढीवरच नाही तर माझ्या आधीच्या पिढीवरही प्रभाव टाकला आहे. माझ्यानंतर अशा अनेक पिढ्या असतील, ज्या तुमच्याकडून शिकतील आणि तुमच्याकडून प्रेरित होतील. दीर्घायुष्य जगा, निरोगी राहा आणि आम्हाला प्रेरणा देत राहा. एक छोटासा मुलगा ज्यानं तुम्हाला 'आनंद' मध्ये पाहिलं होतं. आजही मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. 

अभिनेते बोमन इराणी यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक अविस्मरणीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यात बहुचर्चित क्लासिक्स 'भूतनाथ रिटर्न्स 2', 'लक्ष्य,' 'वक्त' आणि 'उंचाई' यांचा समावेश आहे. 

अमिताभ बच्चन हे भारतीय सिनेसृष्टीतले महानायक म्हणून ओळखले जातात. अमिताभ यांनी गेली वर्ष भारतीय सिनेसृष्टीवर राज्य केलं. वयाची ऐंशी ओलांडली तरी अजुनही अमिताभ बच्चन भारतीय मनोरंजन विश्वात सक्रीय आहेत. अमिताभ सध्या KBC 15 चं सूत्रसंचालन करत आहेत.
 

Web Title: Boman Irani Birthday Wishes to Best Friend Big B video