बॉलिवूडच्या ‘या’ जोड्यांच्या अफेअरने गाजले २०१८ वर्ष!
By अबोली कुलकर्णी | Updated: December 28, 2018 13:30 IST2018-12-28T12:45:57+5:302018-12-28T13:30:39+5:30
सरत्या वर्षाला निरोप देताना अनेक गॉसिप्स, प्रेमप्रकरणे आणि वाद-संघर्ष या सर्व बाबी समोर आल्या. आता हेच पाहा ना, हे वर्ष बॉलिवूडच्या अनेक कपल्सच्या अफेअर्सनी गाजले.

बॉलिवूडच्या ‘या’ जोड्यांच्या अफेअरने गाजले २०१८ वर्ष!
अबोली कुलकर्णी
२०१८ हे वर्ष विविध कारणांनी गाजले. सरत्या वर्षाला निरोप देताना अनेक गॉसिप्स, प्रेमप्रकरणे आणि वाद-संघर्ष या सर्व बाबी समोर आल्या. आता हेच पाहा ना, हे वर्ष बॉलिवूडच्या अनेक कपल्सच्या अफेअर्सनी गाजले. अनेकांचे अफेअर हे चित्रपटाच्या सेटवर सुरू झाले तर काहींनी सार्वजनिकरित्या त्यांचे नाते क बूल क रून नात्याला अर्थ मिळवून दिला. चला तर मग पाहूयात, कोणत्या आहेत या जोड्या...
* फरहान अख्तर-शिबानी दांडेकर
वैयक्तिक नात्याबद्दल वारंवार चर्चेत असणारा फरहान अख्तर त्याच्या शिबानी दांडेकर हिच्यासोबतच्या नात्याच्या बाबतीत चर्चेत राहिला. त्याने दोघांचेही रोमँटिक फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले होते. अशातच त्याने त्यांच्या दोघांचेही नाते सार्वजनिकरित्या मान्य केले आहे.
* जान्हवी कपूर-इशान खट्टर
‘धडक’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्यासोबतच डेब्यू करणारा अभिनेता इशान खट्टर याच्यासोबतच्या अफेअरबाबत चर्चेत होती. त्या दोघांचे अनेक रोमँटिक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या दोघांचे नाते देखील चर्चेत होते.
* ईशा गुप्ता-निखिल थम्पी
अभिनेत्री ईशा गुप्ता ही गेल्या काही दिवसांपासून फॅशन डिझायनर निखिल थम्पी याच्यासोबत नात्यात होती. ईशा लवकरच बॉयफ्रेंड निखिल याच्यासोबत साखरपुडा करणार आहे. मात्र, ईशाने या गोष्टीला अफवा म्हणत स्वत:ला सिंगल असल्याचे सांगितले आहे.
* उर्वशी रौतेला-हार्दिक पांड्या
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही अशातच तिच्या हॉट अदांमुळे चर्चेत आहे. परंतु, २०१८ मध्ये क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली. ते मुंबईत एकदा एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसले होते. त्यासोबतच त्यांचे पार्टी फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
* हर्षवर्धन राणे-किम शर्मा
बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणे आणि अभिनेत्री किम शर्मा हे दोघे इंडस्ट्रीत खूप चर्चेत होते. सध्या हे दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. अशातच त्यांनी त्यांचे नाते सर्वांसमोर कबूल केले आहे. त्यांची ही जोडी २०१८ या वर्षात चर्चेत होती.
* श्रुती हसन-मायकल कोर्सेल
बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसन ही बॉयफे्रंड मायकेल कोर्सेल यांच्यासोबत डेटवर जात आहे. मुंबईच्या रस्त्यांवर ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरताना दिसत आहे. मात्र, तिने हे त्यांचे नाते अद्याप कबूल केले नाही. पण ती कायम चर्चेत होती.