मौनी रायला मिळणार बॉलिवूडचे तिकिट! भाईजान सलमान खान करणार लॉन्च!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2017 11:41 IST2017-05-04T06:11:25+5:302017-05-04T11:41:25+5:30

सलमान खान बॉलिवूडचा ‘दबंग’ म्हणून ओळखला जातो. पण तसे बघाल तर भाईजान सलमान बॉलिवूडमध्ये सगळ्यांचाच आवडता आहे आणि असायला ...

Bollywood's tweet to be won! Brother Salman Khan launches !! | मौनी रायला मिळणार बॉलिवूडचे तिकिट! भाईजान सलमान खान करणार लॉन्च!!

मौनी रायला मिळणार बॉलिवूडचे तिकिट! भाईजान सलमान खान करणार लॉन्च!!

मान खान बॉलिवूडचा ‘दबंग’ म्हणून ओळखला जातो. पण तसे बघाल तर भाईजान सलमान बॉलिवूडमध्ये सगळ्यांचाच आवडता आहे आणि असायला का नको, गरजेच्यावेळी मदतीसाठी धावून येणारा सलमान हा एकमेव व्यक्ति असतो. केवळ एवढेच नाही, अनेकांना बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यांचे क्रेडिटही त्याला जाते. आत्तापर्यंत अनेकांना सलमानने बॉलिवूडमध्ये लॉन्च केले आहे. या यादीत आणखी एक नाव जोडले जाणार आहे. होय, आम्ही बोलतोय  ते, टीव्हीची ग्लॅमरस डॉल मौनी रॉय हिच्याबद्दल.  सलमान खान मौनीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार असल्याची खबर आहे.



ALSO READ :   मौनी रॉय बॉयफ्रेंड मोहितसह झाली इंटिमेट सोशलमीडियावर व्हायरल झाले PHOTO?

मौनीला आपल्या होम प्रॉडक्शनअंतर्गत बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचे सलमानने मनावर घेतले आहे. सलमानच्या मते, मौनीचा देसी लूक अतिशय सुंदर आहे. ती साडीसह सगळ्याच पारंपरिक व वेस्टर्न कपड्यांमध्ये सुंदर दिसते. त्याचमुळे मौनीला बॉलिवूडमध्ये आणण्याचे त्याने ठरवले आहे.
तसे तुम्हाला ठाऊक असेलच की, सलमान मौनीचा खूप मोठा फॅन आहे. ‘बिग बॉस’मध्ये जेव्हा केव्हा टीआरपीचा विषय निघाला, प्रत्येकवेळी सलमानने ‘नागीन’ मौनी रायची आठवण केली. ‘बिग बॉस’चा टीआरपी वाढावा म्हणून या शोच्या मंचावर मौनी स्पेशल डान्स परफॉर्मन्स करताना दिसली होती. मौनीबद्दल सलमानचे प्रेम इथेच संपत नाही. अलीकडे सलमानने आपल्या बर्थ डे पार्टीला मौनीला खास निमंत्रित केले होते. खास इनिविटेशन देऊन त्याने मौनीला पनवेल येथील त्याच्या फार्म हाऊसवर पार्टीसाठी बोलवले होते.
मौनी रायने ‘नागीन’ या मालिकेद्वारे प्रचंड लोकप्रीयता मिळवली. त्याआधीही ‘बुध राजाओं का राजा’, २०१३ मध्ये आलेले ‘महाभारत’, ‘देवो का देव महादेव’ आदी मालिकांमध्ये मौनी दिसली होती.

Web Title: Bollywood's tweet to be won! Brother Salman Khan launches !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.