बॉलिवूडचे ‘हे’ सुपरस्टार्स आहेत बारावी नापास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 16:25 IST2017-05-16T10:47:01+5:302017-05-16T16:25:01+5:30

प्रोफेशनल लाइफ असो वा व्यक्तिगत आयुष्य बॉलिवूड स्टार्सनी काहीही केले तरी अख्खा देश त्यांना फॉलो करतो, शिवाय तो ट्रेण्डही ...

Bollywood's 'super' superstars! | बॉलिवूडचे ‘हे’ सुपरस्टार्स आहेत बारावी नापास!

बॉलिवूडचे ‘हे’ सुपरस्टार्स आहेत बारावी नापास!

रोफेशनल लाइफ असो वा व्यक्तिगत आयुष्य बॉलिवूड स्टार्सनी काहीही केले तरी अख्खा देश त्यांना फॉलो करतो, शिवाय तो ट्रेण्डही बनतो. परंतु एक गोष्ट अशी आहे, ज्यावर अजिबात चर्चा केली जाऊ नये अशी या बॉलिवूड स्टार्सची अपेक्षा असते. अर्थातच हे त्यांचे व्यक्तिगत म्हणजेच शिक्षणाशी संबंधित सिक्रेट आहे. सध्या विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेच्या निकालाची चिंता सतावत आहे, मात्र आज आम्ही जे तुम्हाला सांगणार आहोत, ते ऐकून नक्कीच तुमची चिंता काहीसी दूर होणार आहे. होय, आज जे सेलिब्रिटी जगभरात आपल्या लौकिकाचा डंका वाजवित आहेत, त्यातील बरेचसे असे सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी बारावी परीक्षा उत्तीर्ण होणे तर सोडाच बारावीपर्यंत मजलही मारली नाही. काहींनी तर आपल्या शालेय जीवनातच शिक्षणाला बाय-बाय केला आहे. 



कंगणा राणौत
अभिनेत्री कंगणा राणौत लहानपणापासूनच एक विद्रोही मुलगी होती. मूळची हिमाचल प्रदेशची असलेली कंगणा जेव्हा बारावीत केमिस्ट्री टेस्टमध्ये अनुत्तीर्ण झाली तेव्हा तिला जाणीव झाली की, आता ती पुढे शिक्षण घेऊ शकणार नाही. मात्र अशातही तिने डॉक्टर बनण्यासाठी आॅल इंडिया प्री मेडिकल टेस्टची (एआयपीएमटी) तयारी केली होती, परंतु ती परीक्षा देऊ शकली नाही. पुढे तिने अभिनयात करिअर करण्याचा विचार केला. कित्येक वर्षे ती दिल्ली येथे थिएटर करीत होती. पुढे ती मुंबईला शिफ्ट झाली. 



कॅटरिना कैफ
कमी शिकलेल्या सेलिब्रिटींच्या यादीमध्ये कॅटरिना कैफचेही नाव आहे. हॉँगकॉँग येथे जन्मलेल्या कॅटरिनाला सात भाऊ-बहीण आहेत. तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे. तिने वयाच्या १४व्या वर्षांपासूनच मॉडलिंगला सुरुवात केली होती. त्यातच कौटुंबिक समस्यांमुळे तिला सातत्याने या शहरातून त्या शहरात शिफ्ट व्हावे लागले. त्यामुळे ती शाळेमध्ये जाऊ शकली नाही. पुढे तिने आपले शिक्षण घरीच पूर्ण केले. 



अर्जुन कपूर

अभिनेता अर्जुन कपूर याचा जन्म बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ कपूर परिवारात झाला आहे. निर्माता बोनी कपूर आणि मोना शॉरी कपूर यांचा मुलगा असलेला अर्जुन केवळ बारावीपर्यंतच शिकला आहे. बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्याने अभिनय क्षेत्रात करिअर करण्यास सुरुवात केली. अर्जुनचे लहानपणी तब्बल १४० किलो वजन होते. अशात शिक्षण सोडून अभिनयाचा विचार करणे सुरुवातीला त्याच्या परिवारातील लोकांना पटले नाही. मात्र त्याने वजन कमी करून बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. 



आलिया भट्ट
शिक्षणावरून नेहमीच टीकेची धनी ठरणारी अभिनेत्री आलिया भट्ट हिचेही शिक्षण जेमतेम आहे. दहावीपर्यंत शिकलेल्या आलियाला शाळेत जाण्याचा प्रचंड कंटाळा वाटायचा. अखेर ती अभिनयाकडे वळली. आलिया आज बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 



टायगर श्रॉफ
कमी शिकलेल्या कलाकारांच्या यादीत टायगर श्रॉफचेही नाव आहे. त्याने केवळ बारावीपर्यंतच शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने शिक्षणाला गुडबाय करीत अभिनयाकडे आपला मोर्चा वळविला. 



आमिर खान
मिस्टर परफेक्टनिस्ट अशी ओळख असलेला अभिनेता आमिर खान याचे नावही या लिस्टमध्ये आहे. त्याने बारावीनंतर शिक्षणाला सोडचिठ्ठी देत अभिनयात करिअर करण्यास प्राधान्य दिले. आज तो बॉलिवूडमध्ये सर्वाधिक यशस्वी अभिनेता आहे. त्याच्या ‘दंगल’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर अनेक रेकॉर्ड केले आहेत. 



सलमान खान
आमिरप्रमाणेच सलमान खानही बॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी अभिनेता आहे. मात्र शिक्षणाबाबतीत तोही आमिरप्रमाणेच पिछाडीवर आहे. त्याने ग्वालियरच्या सिंधिया येथून हायस्कूल आणि सेंट स्टॅनिंस्लॉस येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे त्याने शिक्षणापासून दूर जाणे पसंत करीत अभिनयास सुरुवात केली. 



रणबीर कपूर

ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा मुलगा आणि बॉलिवूडमधील सर्वाधिक प्रस्थापित परिवाराचा वारस असलेल्या रणबीर कपूरनेही शिक्षणाला फारसे महत्त्व दिले नाही. बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर रणबीरने मुंबई येथील एचआर कॉलेजमध्ये दोन वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने शिक्षण सोडून न्यू यॉर्क येथील अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. 



दीपिका पादुकोण
बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात असलेल्या दीपिका पादुकोणच्या शिक्षणाचीही अशीच काहीसी परिस्थिती आहे. तिने आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण न करताच अभिनयाकडे मोर्चा वळविला. दीपिकाने बेंगळुरू येथील माउंट कारमेल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. परंतु मॉडलिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या दीपिकाने कॉलेजमध्ये कधी पाऊलच ठेवले नाही. 

Web Title: Bollywood's 'super' superstars!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.