बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत पहिल्यांदाच साकारणार आईची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 15:58 IST2018-08-01T15:50:02+5:302018-08-01T15:58:40+5:30

कंगना राणौत नेहमीच बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. ती नेहमीचो बोल्ड आणि पावरफुल भूमिका साकारताना दिसते.

Bollywood's Queen Kangana Ranaut plays mother roll for the first time | बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत पहिल्यांदाच साकारणार आईची भूमिका

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत पहिल्यांदाच साकारणार आईची भूमिका

ठळक मुद्देकंगना सिल्वर स्क्रिनवर आईची भूमिका साकारणार आहे हा सिनेमा 'कबड्डी' खेळावर आधारित आहे

कंगना राणौत नेहमीच बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. ती नेहमीचो बोल्ड आणि पावरफुल भूमिका साकारताना दिसते. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार कंगना सिल्वर स्क्रिनवर आईची भूमिका साकारणार आहे.  

'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी', 'मेंटल है क्या' सिनेमानंतर कंगना अश्विनी अय्यर तिवारीच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 'कबड्डी' खेळावर आधारित आहे.  
कंगना यात कबड्डी खेळाडूची भूमिका साकारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंगना यात कॉलेजच्या मुलीपासून ते विवाहीत स्त्री आणि नंतर आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. जर ही माहिती खरी ठरली तर कंगना पहिल्यांदा स्क्रिनवर आईची भूमिका साकारताना दिसेल. 

या चित्रपटात कंगना राणौतसोबत  राजकुमार रावसुद्धा आहे. राजुमारने या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे मात्र त्यांने ती जरा हटके पद्धतीने केली आहे. 'मेंटल है क्या' 22 फेब्रुवारी 2019ला रिलीज होणार आहे. 

लवकरच कंगना 'माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपट झांसीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. अंकिता लोखंडे यात राणी लक्ष्मीबाईची खास मैत्रिण झलकारी बाईची भूमिका साकारते आहे. ती याचित्रपटातून मोठ्या पडद्यावर एंट्री घेते आहे. वैभव तत्त्ववादी पूरण सिंह हे पात्र साकारणार आहे. पुरण सिंह हा राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक भरवशाचा सरदार होता. राणीच्या रक्षणासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती. या चित्रपटात कडून कंगना खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात ती राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत दिसेल. येत्या १५ ऑगस्टला या चित्रपटाचा टीजर रिलीज होणार आहे. 

Web Title: Bollywood's Queen Kangana Ranaut plays mother roll for the first time