अनुष्का शर्माकडे पाहून बॉलीवुडचा किंग खान का घाबरला?,जाणून घ्या काय होतं त्या मागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 10:19 IST2018-11-03T10:16:12+5:302018-11-03T10:19:09+5:30

अभिनयाचे वेड असून कायमच आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला योग्य देण्याचा प्रयत्न असतो असं सांगायलाही शाहरूख यावेळी विसरला नाही.

Bollywood's King Khan was afraid of Anushka Sharma, the reason behind knowing what was happening | अनुष्का शर्माकडे पाहून बॉलीवुडचा किंग खान का घाबरला?,जाणून घ्या काय होतं त्या मागचं कारण

अनुष्का शर्माकडे पाहून बॉलीवुडचा किंग खान का घाबरला?,जाणून घ्या काय होतं त्या मागचं कारण

किंग खान शाहरुखच्या बहुप्रतिक्षित झीरो सिनेमाचा ट्रेलर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी लॉन्च करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात बॉलीवुडच्या बादशाहने माध्यमांच्या प्रतिनिधींशी दिलखुलास संवाद साधला. या कार्यक्रमासाठी शाहरुखसह अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मासुद्धा उपस्थित होत्या. विविध प्रश्नांची यावेळी शाहरूखने मोठ्या खुबीने उत्तरं दिली. यावेळी कोणत्या क्रिकेटरने झीरोवर आऊट व्हावं आणि झीरो सिनेमाचं प्रमोशन करावं असं वाटतं असा प्रश्न शाहरुखला विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देण्याआधी शाहरुखने आधी हळूच अनुष्काकडे पाहिलं. शाहरुखने पाहताच अनुष्काही आपलं हसू रोखू शकली नाही.

भारतीय क्रिकेटरबाबत काहीही बोललो तर माझ्या शेजारी असलेल्या अनुष्काला राग येईल. कारण ती मिसेस क्रिकेटर आहे असं उत्तर शाहरुखने यावेळी दिलं. विराट कोहलीचंही यावेळी शाहरुखने कौतुक केलं. आपण एक स्वप्नवत जीवन जगलो आहोत आणि विराटसुद्धा एक दैवी देणगी लाभलेला एक व्यक्ती आहे असे गौरवोद्गार शाहरुखने काढले. याचा अर्थ आपल्यालाही दैवी देणगी लाभली असं म्हणत नाही, मात्र अभिनयाचे वेड असून कायमच आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला योग्य देण्याचा प्रयत्न असतो असं सांगायलाही शाहरूख यावेळी विसरला नाही.

यावेळी शाहरुखला दीपिका-रणवीर आणि प्रियांका-निक यांच्या लग्नाविषयी विचारण्यात आलं. शाहरुखने प्रियांकाच्या लग्नाविषयी काहीही बोलणं टळलं. दीपिकाला मात्र शाहरुखने खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. दीपिकाला खूप सारे प्रेम आणि ईश्वर तिच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो असं शाहरुखनं म्हटलं. दोघांच्या लग्नाची बातमी समोर येताच दीपिकाला फोन करुन आपल्यासारखंच लग्नानंतर खूश राहण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या असं शाहरुखने सांगितले.

Web Title: Bollywood's King Khan was afraid of Anushka Sharma, the reason behind knowing what was happening