बॉलिवूडचे पहिले शोमॅन राजकपूरबद्दल अनिल कपूरने केले चकित करणारे वक्तव्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2017 20:14 IST2017-07-23T14:44:58+5:302017-07-23T20:14:58+5:30
अनिल कपूर लवकरच त्याच्या आगामी ‘मुबारका’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटात अनिलसोबत इलियाना डिक्रूज, अथिया शेट्टी आणि ...
बॉलिवूडचे पहिले शोमॅन राजकपूरबद्दल अनिल कपूरने केले चकित करणारे वक्तव्य!
अ िल कपूर लवकरच त्याच्या आगामी ‘मुबारका’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटात अनिलसोबत इलियाना डिक्रूज, अथिया शेट्टी आणि अर्जुन कपूर हे दिसणार आहेत. पहिल्यांदाच तो पुतण्या अर्जुन कपूर याच्यासोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सध्या याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण कास्ट बिझी आहे. नुकताच निर्मात्यांनी प्रमोशनसाठी एका इव्हेंटचे आयोजन केले होते. या इव्हेंटमध्ये अनिल कपूरने असे काही वक्तव्य केले की, उपस्थित दंग राहिले.
इव्हेंटदरम्यान जेव्हा अनिल कपूरला विचारण्यात आले की, मनोरंजन जगतातील कोणत्या व्यक्तीचा तुझ्यावर सर्वाधिक प्रभाव आहे? त्याचे उत्तर देताना अनिल कपूरने लगेचच ‘राज कपूर’ हे नाव घेतले. अनिल कपूरने म्हटले की, ‘राज कपूर सर्वात मोठे शोमॅन होते. ते खूपच प्रभावी कलाकार आणि महान दिग्दर्शक होते. त्यांचे चित्रपट खूपच मनोरंजक असत. त्यांच्या चित्रपटाचे संगीत आणि बॅकग्राउंड स्कोर एकदम हटके असायचा. त्यांनी त्यांच्या चित्रपटात ज्या पद्धतीने अभिनेत्रींना सादर केले, मला नाही वाटत की दुसरा कोणता निर्माता असे करू शकेल. त्यामुळे मला असे वाटते की, राजकुमार साहेब यांचा माझ्यावर सर्वाधिक प्रभाव आहे.
अनिल कपूरच्या ‘मुबारका’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बाजमी यांनी केले होते. अनीसला त्यांच्या कॉमेडी चित्रपटांसाठी ओळखले जाते. चित्रपट २८ जुलै रोजी रिलीज होणार आहे. चित्रपट निर्मात्यांच्या मते, हा एक फॅमिली एंटरटेनर चित्रपट आहे. त्यामुळे प्रत्येक प्रेक्षक या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो. वास्तविक लोकांमध्ये या चित्रपटाविषयी खूप उत्साह बघावयास मिळत आहे. कारण पहिल्यांदाच काका-पुतण्या पडद्यावर एकत्र येत आहेत.