बॉलिवूडचा डेंजरस व्हिलन, १५ सिनेमानंतर अचानक सोडली इंडस्ट्री अन् बनला मौलाना, ओळखलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 10:53 IST2025-03-13T10:52:40+5:302025-03-13T10:53:17+5:30
आज आम्ही तुम्हाला त्या बॉलिवूड अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत जो अल्पावधीतच बॉलिवूडचा डेंजरस खलनायक बनला. पण एक दिवस अचानक तो इंडस्ट्री सोडून अल्लाहच्या मार्गावर निघाला.

बॉलिवूडचा डेंजरस व्हिलन, १५ सिनेमानंतर अचानक सोडली इंडस्ट्री अन् बनला मौलाना, ओळखलंत का?
हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक सौंदर्यवती आहेत ज्यांनी धर्माच्या नावाखाली चित्रपटांना अलविदा केले आहे. यामध्ये झायरा वसीम आणि सना खान यांची नावे सर्वात आधी डोळ्यासमोर येतात. पण आज आम्ही तुम्हाला त्या बॉलिवूड अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत जो अल्पावधीतच बॉलिवूडचा डेंजरस खलनायक बनला. पण एक दिवस अचानक तो इंडस्ट्री सोडून अल्लाहच्या मार्गावर निघाला.
बॉलिवूडच्या या अभिनेत्याने १९९० साली रिलीज झालेल्या 'फूल और कांटे' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. चित्रपटात खलनायक म्हणून तो नेहमीच टशनमध्ये असायचा. पण अजय देवनने त्याला चित्रपटात खूप मारले होते. या चित्रपटात त्याची दखल घेतली गेली आणि त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. हा अभिनेता दुसरा कोणी नसून आरिफ खान आहे. यानंतर आरिफ खान 'मुस्कुराहट', 'बागी सुलतानिया', 'मोहरा', 'अलंकार', 'हलचल', 'दिलजले' आणि 'वीरगती' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसला. या सगळ्यात तो नकारात्मक भूमिकेत दिसला. आरिफने आपल्या करिअरमध्ये १५ चित्रपटांमध्ये काम केले. त्याचा शेवटचा चित्रपट २००७ साली आला होता. ज्याचे नाव होते 'अ माइटी हार्ट'. हा हॉलिवूडचा चित्रपट होता ज्यात त्याने टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका केली होती.
आरिफची कारकीर्द अल्पकाळ टिकली असावी. पण त्याने अजय देवगण ते सुनील शेट्टी यांसारख्या स्टार्ससोबत काम केले. पण आरिफला बॉलिवूडचे आयुष्य फार काळ आवडले नाही, त्यानंतर त्याने चित्रपट सोडून अल्लाहचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. १९९७ मध्ये आरिफ तबलीगी जमातमध्ये सामील झाला. यानंतर मुस्लिम प्रामुख्याने आध्यात्मिक कार्यात सक्रिय झाला. त्याने इस्लाम धर्माचा प्रचार केला आणि लोकांना इस्लामच्या तत्त्वांची जाणीव करून दिली.
या कारणामुळे सोडलं बॉलिवूड
एका जुन्या मुलाखतीत आरिफ खानने इंडस्ट्री सोडण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले होते. ही मुलाखत लहरेन रेट्रोला दिली होती. ज्यामध्ये आरिफ म्हणाला होता की, 'खूप अस्वस्थता होती. शांतता नव्हती. मनात एका ना कोणत्या गोष्टीचा लोभ होता. जसे कधी भूमिकेसाठी तर कधी चित्रपटासाठी. असा समाधानी होऊ शकला नसता. इंडस्ट्रीत काम करत असताना मला वाईट सवयी लागल्या होत्या. ड्रग्ज घेण्यास सुरुवात केली. झोप येत नव्हती. त्यामुळे अमली पदार्थांचा अवलंब करावा लागला. या सर्व कारणांमुळे त्याने अल्लाहचा आश्रय घेतला. मौलाना बनल्यानंतर आरिफ खानचा लूक पूर्णपणे बदलला आहे. त्याचा लेटेस्ट फोटो पाहून तुम्हाला त्याला ओळखणे कठीण होईल. तो आता आपले जीवन साधेपणाने जगत आहे. त्याचा लूक हुबेहूब मौलानासारखा आहे. त्याच्या भाषणाचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.