बॉलिवूडमधील मोठ्या स्टार्सची डिजिटलकडे वाटचाल, माधुरी दीक्षित, अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा झळकणार वेबसीरिजमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 16:47 IST2021-05-19T16:47:03+5:302021-05-19T16:47:36+5:30
कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी आणि कलाकारांनी आपला मोर्चा डिजिटल माध्यमांकडे वळवला आहे.

बॉलिवूडमधील मोठ्या स्टार्सची डिजिटलकडे वाटचाल, माधुरी दीक्षित, अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा झळकणार वेबसीरिजमध्ये
कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी आणि कलाकारांनी आपला मोर्चा डिजिटल माध्यमांकडे वळवला. या वर्षीही बॉलिवूडमधील काही दिग्गज कलाकार मंडळी डिजिटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री करणार आहेत. यात माधुरी दीक्षित, अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, शाहिद कपूर, अक्षय खन्ना यासारख्या कलाकारांचा समावेश आहे.
बॉलिवूडची धक धक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितदेखील डिजिटल माध्यमात पदार्पण करते आहे. ती 'फाइंडिंग अनामिका' नावाच्या वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. तिची ही पहिली वेबसिरीज असून तिने 'फाइंडिंग अनामिका'चा फर्स्ट लूक नुकताच शेअर केला. नेटफ्लिक्सच्या या सिरीजमध्ये माधुरीसोबत संजय कपूर, मानव काैर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेता अजय देवगण रुद्रा या वेबसीरिजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. ही वेबसिरीज हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 'लुथर' या ब्रिटिश सिरीजचा हा हिंदी रिमेक असून तो एक सायकोलॉजिकल ड्रामा आहे.
याशिवाय सोनाक्षी सिन्हाची 'फॉलन' ही वेबसिरीजही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात ती एका डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
तसेच अभिनेता शाहिद कपूरदेखील अॅमेझॉन प्राईमची वेबसिरीज करणार आहे. या वेबसिरीजचे नाव निश्चित झालेले नाही. तर अक्षय खन्ना हा अभिनेतादेखील डिजिटल पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. अक्षयच्या 'लेगेसी' या वेबसिरीजचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे. काही भागांचे शूटिंग लॉकडाऊनमुळे थांबले आहे.