बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्रीही 'या' तारखेला अडकणार विवाहबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 11:48 IST2018-03-03T06:18:30+5:302018-03-03T11:48:30+5:30
सध्या सगळीकडे लगीनघाई सुरु आहे.मात्र सेलिब्रिटी मंडळींमध्ये सध्या जरा जास्तच लगीनघाई आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये. चित्रपटसृष्टीतील विविध ...

बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्रीही 'या' तारखेला अडकणार विवाहबंधनात
स ्या सगळीकडे लगीनघाई सुरु आहे.मात्र सेलिब्रिटी मंडळींमध्ये सध्या जरा जास्तच लगीनघाई आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये. चित्रपटसृष्टीतील विविध कलाकार गेल्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकले आहेत.बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मानंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे.दृश्यम सिनेमात अजय देवगनच्या पत्नीच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री श्रिया सरन पुढच्या महिन्यात लग्न करणार आहे.श्रिया रशियन बॉयफ्रेंड एंड्रे कोसचीवसह विवाहबंधनात अडकणार आहे.येत्या १७ ते १९ मार्च दरम्यान श्रिया आणि एंड्रे उदयपूरमध्ये ‘डेस्टीनेशन वेडिंग’ करणार आहे.त्यामुळे सध्या श्रिया तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. लग्न पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे.एंड्री हा रशियातील एक प्रसिद्ध व्यावसायिक आहे. याशिवाय अँड्री राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटुही आहे. एंड्री रशियात आई आणि भावासोबत सेंट पीटर्सबर्ग येथे राहतो. त्याला २०१५ मध्ये सर्वोत्कृष्ट युवा व्यावसायिकाचा पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.श्रिया सरनने बॉलिवूडमध्ये जास्त केले नसले तरीही दाक्षिणात्य सिनेसृष्टीती खूप लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. श्रियाने बॉलिवूड सिनेमासोबतच अनेक तेलुगू, तमिळ, कन्नड सिनेमांत काम केले आहे. तिने आतापर्यंत 'तुझे मेरी कसम','थोडा तुम बदलो थोडा हम', 'शुक्रिया', 'आवारापन', 'मिशन इस्तंबुल' ‘जिला गाजियाबाद’, ‘गली गली में चोर है’ या सिनेमांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या सगळ्या सिनेमांमध्ये श्रियाने अजय देवगनसोबत दृश्यम सिनेमात केलेल्या कामाचे खूप कौतुक झाले होते.सिनेमातील इतर भूमिकाप्रमाणे श्रियाने साकारलेली भूमिकेनेही रसिकांची पसंती मिळवली होती. ‘दृश्यम’ हा सिनेमा सुपर हिट ठरला होता.श्रियाने ‘इशितम’ या तेलगू चित्रपटापासून श्रियाने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली होती. यानंतर २००२ मध्ये ‘संतोषाम’ हा तिचा दुसरा चित्रपट आला.या चित्रपटाने बम्पर कमाई केली होती.२००७ मध्ये तामिळ चित्रपट ‘शिवाजी’ या तिच्या चित्रपटानेही रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.या चित्रपटात तिच्या अपोझिट मेगास्टार रजनीकांत झळकले होते.सध्या श्रिया लग्नाच्या तयारीत बिझी आहे.आपल्या जीवनातील हा सुंदर आणि खास सोहळा आयुष्यभर लक्षात राहावा यासाठी श्रिया कोणतीही कसर सोडत नाहीय.