​बॉलिवूड स्टार्स तर सोडा आता कमाल आर खान घेणार ट्विटरशी पंगा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 15:32 IST2017-10-20T10:02:19+5:302017-10-20T15:32:19+5:30

आमिर खानसोबत पंगा घेणे कमाल आर खान उर्फ केआरकेला चांगलेच महाग पडलेयं. कारण यामुळे केआरकेचे ट्विटर अकाऊंट काही काळासाठी ...

Bollywood superstar Shahrukh Khan will be keen to make a comeback! | ​बॉलिवूड स्टार्स तर सोडा आता कमाल आर खान घेणार ट्विटरशी पंगा!!

​बॉलिवूड स्टार्स तर सोडा आता कमाल आर खान घेणार ट्विटरशी पंगा!!

िर खानसोबत पंगा घेणे कमाल आर खान उर्फ केआरकेला चांगलेच महाग पडलेयं. कारण यामुळे केआरकेचे ट्विटर अकाऊंट काही काळासाठी बंद करण्यात आले आहे. आमिरच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’या चित्रपटाचे समीक्षण केआरकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिले होते. पण या समीक्षणात त्याने कथितरित्या चित्रपटाचा शेवट उघड केला होता. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.अर्थात केआरकेचे ट्विटर अकाऊंट पहिल्यांदा बंद झालेले नाहीच. अशाप्रकारे त्याचे ट्विटर अकाऊंट बंद करण्याची ही दुसरी वेळ आहे. पण यामुळे सुधारणार तो केआरके कसला? आता या कारवाईविरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय केआरकेने घेतला आहे.

 खरे तर केआरकेचे ट्विटर  अकाऊंट बंद झाल्याने नेटिजन्स खूश आहेत. केआरकेचे अकाऊंट बंद होणे म्हणजे, दिवाळी भेट असल्याची प्रतिक्रिया अनेक नेटिजन्सनी व्यक्त केली आहे. पण स्वत: केआरके मात्र यामुळे जाम भडकला आहे.  ‘६० लाखांवर फॉलोअर्स मिळवण्यासाठी गेल्या चार वर्षांत मी प्रचंड मेहनत घेतली आहे आणि बराच पैसा खर्च केला आहे. मी ट्विटरविरोधात कोर्टात जाणार आणि आतापर्यंत आजपर्यंत मी माझ्या ट्विटर अकाऊंटसाठी जो काही पैसा आणि वेळ खर्च केला आहे त्याची भरपाई मला मिळावी, अशी   मागणी करणार. साठ लाख फॉलोअर्सचं माझं अकाऊंट अशाप्रकारे कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्याचा अधिकार ट्विटरला नाही’, असे त्याने म्हटले आहे.
यापूर्वी दिवाळीतच केआरकेचे ट्विटर अकाऊंट काही काळ बंद करण्यात आले होते. अजय देवगणच्या ‘शिवाय’ या चित्रपटाचे चुकीच्या पद्धतीने समीक्षण दिल्याने केआरकेचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले होते. 



ALSO READ: केआरके पुन्हा बरळला म्हणे करिना कपूर आणि मी चार वर्ष रिलेशनशीपमध्ये होतो

खरे तर लोकांनी ओळखावे, असे केआरकेने काहीही केलेले नाही. पण ‘बिग बॉस’शोमध्ये आला अन् केआरकेला लोक ओळखू लागले. यानंतर केआरकेने ट्विटरवर बॉलिवूड स्टार्सला टार्गेट करून चर्चेत राहण्याचे प्रयत्न केलेत. त्यांच्या या प्रयत्नांना नाही म्हणता, म्हणता चांगलेच यश आले आणि त्यामुळेच चर्चेत राहण्याचा हा फंडा आजही केआरके वापरताना दिसतोयं. 
  

Web Title: Bollywood superstar Shahrukh Khan will be keen to make a comeback!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.