या कलाकारांनी इंटीमेट सीन्स करताना वापरली ही टेक्निक, वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 16:30 IST2018-07-17T16:30:17+5:302018-07-17T16:30:53+5:30

काही कलाकारांनी सिनेमातील त्यांचे इंटीमेट सीन्स करण्यासाठी एका टेक्निकचा वापर केला. ही तुम्हाला थक्क करून सोडेल. चला जाणून घेऊ या कलाकारांनी कसे केलेत हे सीन्स.....

Bollywood stars used body double for intimate scene in the film | या कलाकारांनी इंटीमेट सीन्स करताना वापरली ही टेक्निक, वाचून व्हाल थक्क!

या कलाकारांनी इंटीमेट सीन्स करताना वापरली ही टेक्निक, वाचून व्हाल थक्क!

बॉलिवूडमध्ये आता किसींग सीन साधारण बाब झाली आहे. पण आता इंटीमेट सीन करण्यासाठीही कलाकार मागे हटत नाहीत. पण काही कलाकारांनी सिनेमातील त्यांचे इंटीमेट सीन्स करण्यासाठी एका टेक्निकचा वापर केला. ही तुम्हाला थक्क करून सोडेल. चला जाणून घेऊ या कलाकारांनी कसे केलेत हे सीन्स.....

'बॅडिंट क्वीन' या सिनेमात अभिनेत्री सीमा बिश्वास अफलातून काम केलं होतं. या सिनेमात त्यांनी फूलन देवीची भूमिका केली होती. या सिनेमात अनेक रेप सीन्स होते. काही न्यूड सीन्सही होते. पण या न्यूड सीन्ससाठी सीमा बिश्वास यांनी बॉडी डबलचा वापर केल होता. 

'त्रिशाग्नी' या सिनेमात अभिनेत्री पल्लवी जोशीने अनेक न्यूड सीन्स केलेत. पण या सीन्ससाठी पल्लवीने बॉडी डबलचा वापर केला होता. 

तुम्हाला हे वाचून आश्चर्याचा धक्का बसेल की, 'एक पहेली लीला' या सिनेमात सनी लिओनीने अभिनेता मोहित अग्रवालच्या जागी पती डॅनिअल वेबरसोबत इंटिमेट सीन्स दिले होते. 

सलमान खानसारखाच अली जफरही इंटिमेट सीन्ससाठी तयार होत नाही. इतकेच नाही तर त्याने 'लंडन पॅरिस न्यूयॉर्क' या सिनेमातील किसींग सीनसाठी बॉडी डबलचा वापर केला होता. 

९० च्या दशकात अभिनेत्री मनिषा कोईरालाने अनेक सिनेमांमध्ये बोल्ड सीन्स दिले होते. पण तिने नेहमी दावा केलाय की, तिने या सीनसाठी बॉडी डबलचा वापर केला होता.

मल्लिका शेरावतने 'मर्डर' सिनेमात अनेक बोल्ड सीन्स दिले होते. पण तिचा भाऊ आणि निर्मात्यांचं म्हणनं आहे की, तिने या सीन्ससाठी बॉडी डबलचा वापर केला होता. 

'फायर' हा सिनेमा होमोसेक्शुअॅलिटीवर आधारित होता. यातही अनेक इंटिमेट सीन्स होते. या सिनेमात नंदीता दास आणि शबाना आझमी यांच्या अनेक इंटिमेट सीन्स होते. पण नंदीताने सांगितले की, या सीनसाठी तिने बॉडी डबलचा वापर केला. 
 

Web Title: Bollywood stars used body double for intimate scene in the film