बॉलिवूड ‘क्वीन’ कंगनाचा ‘घटस्फोट’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 12:02 IST2016-10-13T06:46:45+5:302016-10-17T12:02:52+5:30
कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांचा वाद अजूनही सुरुच आहे. कंगना व हृतिकचा हा वाद चांगलाच गाजला. आता एका ...

बॉलिवूड ‘क्वीन’ कंगनाचा ‘घटस्फोट’!!
क गना राणौत आणि हृतिक रोशन यांचा वाद अजूनही सुरुच आहे. कंगना व हृतिकचा हा वाद चांगलाच गाजला. आता एका नव्या बातमीची चर्चा होतेय. कंगना घटस्फोटीत आहे, अशी एक बातमी आहे. आता कंगनाचा घटस्फोट व्हायला तिचे लग्न केव्हा झाले? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर खरी बातमी ऐका. कंगनाचा रियल लाईफमध्ये नव्हे तर रिल लाईफमध्ये घटस्फोट झालाय. होय, कंगना लवकरच हंसल मेहतांच्या ‘सिमरन’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कंगना घटस्फोटित महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या अटलांटा येथे या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. ‘सिमरन’मध्ये कंगना कुण्या साध्याभोळ्या घटस्फोटित महिलेची भूमिका साकारणार नाहीयं तर तिची ही भूमिकाही एकदम हटके असणार आहे. यात ती एका नव्या लूकमध्ये दिसणार आहे. आता कंगनाला या नव्या लूकमध्ये पाहण्यास तिचे चाहते आतूर असणार, हे सांगणे नकोच!