​ही बॉलिवूडची अभिनत्री गेली होती दारुच्या अधीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 13:40 IST2018-02-24T08:10:57+5:302018-02-24T13:40:57+5:30

पूजा भट्टला बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री मानले जाते. तिने तिच्या कारकिर्दीत दिल है के मानता नही, सडक, जख्म, फिर ...

This Bollywood movie was under the influence of alcohol | ​ही बॉलिवूडची अभिनत्री गेली होती दारुच्या अधीन

​ही बॉलिवूडची अभिनत्री गेली होती दारुच्या अधीन

जा भट्टला बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री मानले जाते. तिने तिच्या कारकिर्दीत दिल है के मानता नही, सडक, जख्म, फिर तेरी याद आयी यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. बॉर्डर या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले होते. तिला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. पूजा ही प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते महेश भट्ट यांची मुलगी असल्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणे तिच्यासाठी कठीण नव्हते. तिने सुरुवातीच्या काळात तर तिच्या वडिलांच्याच अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अभिनयात यश मिळाल्यानंतर ती दिग्दर्शन आणि निर्मितीकडे वळली. 
पूजा भट्टला खूपच कमी वयात यश मिळाले होते. पूजाचा जन्म भट्ट कुटंबात २४ फेब्रुवारी १९७२ला झाला. अभिनयासाठी पूजाची प्रशंसा केली जात असली तरी त्या काळात तिच्या दारुच्या व्यसनाची चांगलीच चर्चा होती. एवढेच नव्हे तर ती दारुच्या अधीन गेली असल्याची कबुली तिनेच तिच्या काही मुलाखतींमध्ये दिली आहे. ती या दारुच्या व्यसनातून बाहेर कशी आली यावर ती पुस्तक देखील लिहिणार आहे. 
पुजाने तिच्या मुलाखतीत सांगितले होते की, मी केवळ २३ वर्षांची असताना सगळ्यात पहिल्यांदा सिगारेट ओढली. मी १६ व्या वर्षापासून दारू पित आहे. माझ्या कुटुंबात अतिशय मोकळे वातावरण मी घरातच अनेक वेळा दारू पित असे. रविवारी तर आवर्जून वाईन आणि बियर घरी प्यायली जायची. या सगळ्यामुळे मी दारुच्या अधीन कधी गेली हे मला देखील कळले नाही. पण माझ्या वडिलांच्या केवळ एका मेसेजमुळे मी दारू सोडली. मी आणि माझे वडील २१ डिसेंबर २०१६ ला मेसेजद्वारे एकमेकांशी बोलत होतो. आम्ही देशाची सध्या स्थिती काय आहे यावर बोलत होतो. ते बोलून झाल्यावर त्यांनी मला आय लव्ह यू बेटा असा मेसेज पाठवला. त्यावर मी देखील आय लव्ह यू टू चा मेसेज पाठवला. त्यावर त्यांनी मला मेसेज पाठवला की, तू माझ्यावर प्रेम करत असशील तर स्वतःवर प्रेम करायला शिक... कारण मी तुझ्यातीलच एक आहे. त्या मेसेजनंतर मला माझी चूक लक्षात आली आणि मी दारू पूर्णपणे सोडली. आज माझ्यासमोर कोणी दारू पित असेल तरी मला दारू पिण्याची इच्छा होत नाही. 

Web Title: This Bollywood movie was under the influence of alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.