'तुंबाड'ची कमाई सुसाट! बॉक्स ऑफिसला पछाडलं; अवघ्या ५ दिवसात कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 12:46 IST2024-09-18T12:44:42+5:302024-09-18T12:46:23+5:30

'तुंबाड' सिनेमाने अवघ्या ५ दिवसात मोठी कमाई केेली असून हस्तरला पाहायला थिएटरमध्ये तुडुंब गर्दी दिसून येतेय (tumbbad)

bollywood movie Tumbbad box office collection beat kareena kapoor the buckingham murder movie | 'तुंबाड'ची कमाई सुसाट! बॉक्स ऑफिसला पछाडलं; अवघ्या ५ दिवसात कमावले इतके कोटी

'तुंबाड'ची कमाई सुसाट! बॉक्स ऑफिसला पछाडलं; अवघ्या ५ दिवसात कमावले इतके कोटी

'तुंबाड' सिनेमा पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये रिलीज झालाय. २०१८ साली सर्वप्रथम रिलीज झालेल्या 'तुंबाड' १३ सप्टेंबरला पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये रिलीज झालाय. 'तुंबाड' पाहायला थिएटरमध्ये पुन्हा गर्दी होतेय. हा सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकतोय. २०१८ साली आलेल्या 'तुंबाड'ची जितकी  चर्चा झाली होती त्यापेक्षा अधिक चर्चा 'तुंबाड' पुन्हा रिलीज झाल्यावर होतेय. नवीन सिनेमा जे शुक्रवारी रिलीज झालेत त्यांना 'तुंबाड'ने मात दिली असून बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली.

'तुंबाड'ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई

सोहम शाहची प्रमुख भूमिका असलेला 'तुंबाड' ऐन गणेशोत्सवामध्ये पुन्हा रिलीज झाला. सिनेमा रिलीज होण्याआधीच अॅडव्हान्स बूकींगपासूनच सिनेमाला प्रेक्षकांनी पसंती द्यायला सुरुवात केली. याचाच फायदा सिनेमाला बॉक्स ऑफिसवर झालेला दिसला. 'तुंबाड'ने अवघ्या पाच दिवसांमध्ये १०.१५ कोटींची कमाई केलीय. 'तुंबाड'च्या रिलीजमुळे जे नवीन सिनेमे शुक्रवारी रिलीज झाले त्यांना मोठा फटका बसलाय. यामध्ये करीना कपूरच्या सिनेमाचा मोठा समावेश आहे.

 

'तुंबाड'मुळे करीनाच्या सिनेमाला मोठा फटका

'तुंबाड'ने पाच दिवसात दहा कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याने इतर सिनेमांला मोठा फटका बसलाय. करीना कपूरचा बहुचर्चित आणि विविध फेस्टिव्हलमध्ये गाजलेल्या 'द बकिंघम मर्डर' सिनेमाच्या कमाईवर 'तुंबाड'चा परिणाम झाला आहे. करीनाच्या सिनेमा दरदिवशी फक्त लाखात कमाई करत असून या सिनेमाने पाच दिवसात अवघी ६ कोटींची कमाई केलीय. सिनेमाचं बजेट ४५ कोटी आणि कमाई फक्त ६ कोटी झाल्याने 'तुंबाड'मुळे करीनाच्या सिनेमाला मोठं नुकसान सहन करावं लागतंय, असं दिसतंय.

Web Title: bollywood movie Tumbbad box office collection beat kareena kapoor the buckingham murder movie