​इंस्तबूल अतिरेकी हल्ल्यात बॉलिवूड निर्मात्याचे निधन; बॉलिवूडसाठी मोठा धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 13:18 IST2017-01-02T13:18:51+5:302017-01-02T13:18:51+5:30

बॉलिवूडसाठी नव्या वर्षाची सुरुवात एका दु:खद बातमीने झाली. होय, नामांकित निर्माता आणि उद्योगपती अबीस रिज्वी यांचे इस्तंबूल दहशतवादी हल्ल्यात ...

Bollywood man dies in terrorist attack; Biggest push for Bollywood! | ​इंस्तबूल अतिरेकी हल्ल्यात बॉलिवूड निर्मात्याचे निधन; बॉलिवूडसाठी मोठा धक्का!

​इंस्तबूल अतिरेकी हल्ल्यात बॉलिवूड निर्मात्याचे निधन; बॉलिवूडसाठी मोठा धक्का!

लिवूडसाठी नव्या वर्षाची सुरुवात एका दु:खद बातमीने झाली. होय, नामांकित निर्माता आणि उद्योगपती अबीस रिज्वी यांचे इस्तंबूल दहशतवादी हल्ल्यात निधन झाले. अबीस यांच्या निधनामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
अबीस नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी इंस्तबूलला गेले होते. रविवारी पहाटे येथील एक  सुप्रसिद्ध नाईट क्लबमध्ये सेंटा क्लॉजच्या वेशात आलेल्या व्यक्तिने अंदाधूंद गोळीबार केला. यात ३९ ठार तर ४० जण जखमी झालेत. या मृतांमध्ये अबीस यांच्यासह दोन भारतीयांचा समावेश आहे.
अबीस हे माजी राज्यसभा खासदार अख्तर हसन रिज्वी यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी अनेक  बॉलिवूड चित्रपट प्रोड्यूस केलेत. ‘रोर-टायगर्स आॅफ सुंदरबन’ हा त्यांनी प्रोड्यूस केलेला अखेरचा सिनेमा ठरला. कमल सदाना यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अबीस यांच्या मृत्यूची बातमी येताच बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. अनेकांनी सोशल मीडियावर अबीस यांच्या मृत्यूवर शोक संवेदना व्यक्त केल्या.
अभिनेत्री रवीना टंडन हिने अबीस यांच्या मृत्यूवर तीव्र दु:ख व्यक्त केले. आपण किती प्लान करतो. पण सगळे काही एका झटक्यात आपल्या हातातून सुटून निघून जाते. दहशतवादाचे समर्थन करणारे नरकात जातील, अशा तीव्र शब्दांत रवीनाने आपले दु:ख व्यक्त केले. 

{{{{twitter_post_id####}}}}


{{{{twitter_post_id####}}}}


दिग्दर्शक मधूर भंडारकर यांनीही अबीस यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत, आपल्या संवेदना व्यक्त केल्या. माझा एक जुना मित्र मी गमावला. ही बातमी माझ्यासाठी धक्कादायक आहे, असे त्यांनी लिहिले.

{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Bollywood man dies in terrorist attack; Biggest push for Bollywood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.