"आजही लोक मला आमिर खानची..." किरण रावने व्यक्त केली मनातील खदखद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 16:35 IST2024-04-05T16:29:40+5:302024-04-05T16:35:01+5:30

''आजही लोक मला आमिर खानची एक्स बायको म्हणून हाक मारतात त्याने मला काहीच फरक पडत नाही'',असं किरण राव का म्हणाल्या...जाणून घेऊया 

bollywood lapata ladies producer kiran rao does not care about what people says about her relation with aamir khan  | "आजही लोक मला आमिर खानची..." किरण रावने व्यक्त केली मनातील खदखद 

"आजही लोक मला आमिर खानची..." किरण रावने व्यक्त केली मनातील खदखद 

Kiran Rao On Divorce : सिने- दिग्दर्शक, निर्माती किरण राव मागील काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. नुकताच त्यांचा 'लापता लेडीज' हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. १ मार्चला हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. प्रेक्षकांसोबतच काही बॉलिवूड कलाकारांनी या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं. याच दरम्यान किरण राव यांनी लखनऊमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. 

अलिकडेच सिनेमाच्या प्रमोशनवेळी एका कार्यक्रमादरम्यान किरण राव यांनी आमिर खान सोबतच्या नात्यावर भाष्य करताना म्हटलं, ''खरं सांगायचं झालं तर मला आता याचा त्रास होत नाही. आता मला माझी ओळख जपायची आहे. त्यामुळेच मला माझ्यातील क्षमतांची जाणीव झाली. आता मला सुरक्षित वाटतंय . शिवाय लोक माझ्याबद्दल काय विचार करतात ते मी थांबवू शकत नाही, परंतु त्याचा मी स्वत: ला त्रासही होऊ देत नाही. 

किरण राव या आमिर खानच्या दुसऱ्या पत्नी आहेत. त्यांना आजाद नावाचा एक मुलगाही आहे. २०२१ मध्ये किरण राव आणि अभिनेता आमिर खान यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या दोघांनी घटस्फोट घेऊन आपल्या नात्याला पूर्णविराम दिला. यानंतर या दोघांना बऱ्याच ठिकांणी स्पॉट केलं गेलं. घटस्फोटानंतर एकत्र दिसल्यानंतर नेटकऱ्यांकडून किरण राव बऱ्याचदा ट्रोलही झाल्या होत्या. 

Web Title: bollywood lapata ladies producer kiran rao does not care about what people says about her relation with aamir khan