करीना कपूर-सैफअली खाननं दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलं 'जहांगीर'; जाणून घ्या, या नावाचा अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 09:34 IST2021-08-10T09:31:11+5:302021-08-10T09:34:35+5:30

जेहच्या जन्मानंतर करीनाने तिच्या दोन्ही प्रेग्नन्सी संदर्भात एक पुस्तक लाँच केले आहे, तिने या पुस्तकाचे नाव 'प्रेग्नन्सी बायबल: द अल्टीमेट मॅन्युअल फॉर मॉम टू बी', असे ठेवले आहे. या पुस्तकात तिने तिच्या दोन्ही प्रेग्नन्सीचे अनुभव शेअर केले आहेत.

Bollywood know the meaning of jehangir the name of kareena kapoor s second son | करीना कपूर-सैफअली खाननं दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलं 'जहांगीर'; जाणून घ्या, या नावाचा अर्थ

करीना कपूर-सैफअली खाननं दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलं 'जहांगीर'; जाणून घ्या, या नावाचा अर्थ

मुंबई - करीना कपूर खानने फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या मुलाला जन्म दिला. तैमूरनंतर करीना आपल्या दुसऱ्या मुलाचे नाव काय ठेवते, हे जाणून घेण्याची चाहत्यांची इच्छा आहे. काही दिवसांपूर्वी वृत्त आले होते, की करीनाने मुलाचे नाव 'जेह' असे ठेवले आहे. मात्र, आता त्याच्या नव्या नावाचा खुलासा होत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, करीनाच्या दुसऱ्या मुलाचे नाव जेह नसून जहांगीर अली खान असे आहे.

जेहच्या जन्मानंतर करीनाने तिच्या दोन्ही प्रेग्नन्सी संदर्भात एक पुस्तक लाँच केले आहे, तिने या पुस्तकाचे नाव 'प्रेग्नन्सी बायबल: द अल्टीमेट मॅन्युअल फॉर मॉम टू बी', असे ठेवले आहे. या पुस्तकात तिने तिच्या दोन्ही प्रेग्नन्सीचे अनुभव शेअर केले आहेत.

या पुस्तकाच्या माध्यमातूनच जेहच्या खऱ्या नावाबद्दल कयास लावला जात आहेत. खरे तर, या पुस्तकात करीनाने तिच्या दुसऱ्या मुलाला अनेक ठिकाणी जेह म्हणून संबोधले आहे. मात्र, शेवटच्या काही पानांवर तिने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. तिने प्रेग्नन्सी काळातील काही फोटोज शेअर केली आहेत. या फोटोत तिने जेहचे नाव जहांगीर, असे लिहिले आहे.

'मी साधी भोळी होते आणि करीना खूपच खोडकर होती', करिश्मा कपूरने बेबोबद्दल केले वक्तव्य

जहांगीर हे मोगल शासक अकबराच्या मुलाचे नाव होत. अकबराचा मुलगा मोहम्मद नूर-उद-दीन सलीमचे दुसरे नाव होते. हा एक पारशी शब्द असून याचा अर्थ 'संपूर्ण जगाचा राजा' असा होतो. जेह याचे निक नेम आहे. जसे तैमूरला घरात टिमटिम म्हटले जाते.

Read in English

Web Title: Bollywood know the meaning of jehangir the name of kareena kapoor s second son