बॉलिवूड गॉसिप... हेरा फेरी ३ नंतर आता 'वेलकम ३' मधूनही अक्षयकुमार आऊट?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 04:34 PM2022-11-22T16:34:11+5:302022-11-22T16:34:54+5:30

हेरा फेरी ३ चित्रपटाची प्रतिक्षा अक्षयच्या चाहत्यांना आहे

Bollywood Gossip... Now Akshay Kumar out of Welcome 3 of firoj nadiayawala | बॉलिवूड गॉसिप... हेरा फेरी ३ नंतर आता 'वेलकम ३' मधूनही अक्षयकुमार आऊट?

बॉलिवूड गॉसिप... हेरा फेरी ३ नंतर आता 'वेलकम ३' मधूनही अक्षयकुमार आऊट?

googlenewsNext

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे (Akshay Kumar) अनेक सिनेमे गेल्या काही महिन्यांत आले आणि आले तसे आपटले. बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन, रामसेतू असे चारही एकापाठोपाठ आलेले सिनेमे फ्लॉप गेलेत. 90 च्या दशकातही अक्षयच्या वाट्याला असंच अपयश आलं होतं. त्याकाळात अक्षयचे अनेक सिनेमे फ्लॉप झाले होते आणि हे पाहून एका निर्मात्याने त्याची खिल्ली उडवली होती. अक्षयसाठी सध्याचा काळही त्याच जुन्या दिवसांची आठवण करुन देणारा ठरत आहे. त्यातच, आगामी हेरा फेरी ३ आणि आवारा पागल दिवाना २ हे दोन्ही चित्रपटही अक्षयच्या हातून गेल्याचे वृत्त आहे. 

हेरा फेरी ३ चित्रपटाची प्रतिक्षा अक्षयच्या चाहत्यांना आहे. मात्र, हेरा फेरी ३ चित्रपटात अक्षय कुमारऐवजी कार्तिक आर्यनला घेतल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये होती. विशेष म्हणजे परेश रावल यांनीही कार्तिक आर्यनच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. त्यानंतर, आता आवारा पागल दिवाना २ आणि वेलकम ३ हे चित्रपटही अक्षय कुमारच्या हातून गेल्याचे समजते. विशेष म्हणजे अक्षयच्या करिअर ग्राफमध्ये या तिन्ही चित्रपटांचे मोठे योगदान आहे. मात्र, या तिन्ही चित्रपटांच्या सिक्वलमध्ये अक्षयची गळती होणे हे चाहत्यांसाठीही मोठा धक्का आहे. 

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, हेरा फेरी ३ साठी अक्षयने मानधनात कमी करावी, अशी इच्छा निर्माता फिरोज नाडियावालाची होती, मात्र अक्षयने ती कमी करण्यास नकार दिला होता. तेव्हापासून अक्षय आणि फिरोज यांच्यातील व्यवसायिक संबंधावर दुरी निर्माण झाली. त्यातूनच, आता वेलकम ३ आणि आवारा पागल दिवाना २ या चित्रपटातही अक्षयला संधी मिळणार नसल्याचे वृत्त आहे. 

Web Title: Bollywood Gossip... Now Akshay Kumar out of Welcome 3 of firoj nadiayawala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.