"कमी शिक्षणामुळे त्याच्याकडून मोठी चूक झाली...", राजपाल यादवबद्दल दिग्दर्शक प्रियदर्शन यांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 12:56 IST2026-02-15T12:56:02+5:302026-02-15T12:56:50+5:30

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव ९ कोटी चेक बाऊन्स प्रकरणी तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी राजपालबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. 

bollywood director priyadarshan talk about rajpal yadav said he did big mistake | "कमी शिक्षणामुळे त्याच्याकडून मोठी चूक झाली...", राजपाल यादवबद्दल दिग्दर्शक प्रियदर्शन यांचं मोठं वक्तव्य

"कमी शिक्षणामुळे त्याच्याकडून मोठी चूक झाली...", राजपाल यादवबद्दल दिग्दर्शक प्रियदर्शन यांचं मोठं वक्तव्य

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव ९ कोटी चेक बाऊन्स प्रकरणी तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने तिहार तुरुंगात सरेंडर केलं. एका सिनेमासाठी राजपाल यादवने हे पैसे घेतले होते. पण तो सिनेमा फ्लॉप झाल्याने त्याला मोठं नुकसान झालं. पैसे परत करू शकत नसल्यामुळे राजपाल यादव तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी राजपाल यादवला मदतीचा हात पुढे केला आहे. पण, बॉलिवूड दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी राजपालबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. 

मिड डेला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शन यांनी राजपाल यादवबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "मी राजपालला पहिल्यांदा जंगल सिनेमात पाहिलं होतं. त्याचा अभिनय पाहून मी इंम्प्रेस झालो होतो. त्याच्यासोबत मी मालामाल विकली हा पहिला सिनेमा केला. त्यानंतर माझ्या प्रत्येक सिनेमात राजपाल होता. माझ्या आगामी सिनेमातही तो दिसणार आहे. मी माझ्या निर्मात्यांना सांगितलं आहे की त्याची सध्याची परिस्थिती लक्षात घेता त्याला थोडं जास्त मानधन द्या. आम्हाला सगळ्यांनाच त्याला यातून बाहेर काढायचं आहे. राजपाल माझ्या सिनेमात व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे". 

"मला त्याच्या या समस्येबद्दल आधीपासूनच माहीत होतं. त्यामुळेच मी माझ्या प्रत्येक सिनेमात त्याला घेत असतो. मी अनेक जाहिरातींमध्येही त्याला काम मिळवून दिलं आहे. कमी शिक्षणामुळे त्याने खूप मोठी चूक केली. तो खूप चांगला माणूस आहे", असंही पुढे ते म्हणाले. राजपाल यादवला सोनू सूद, सलमान खान, मिका सिंग यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. 

Web Title : कम शिक्षा के कारण राजपाल यादव से हुई गलती: प्रियदर्शन का बयान।

Web Summary : राजपाल यादव चेक बाउंस मामले में जेल में हैं। निर्देशक प्रियदर्शन ने उनका समर्थन करते हुए उनकी प्रतिभा का हवाला दिया और वित्तीय संकट के बावजूद भूमिकाएँ प्रदान कीं। प्रियदर्शन का मानना है कि यादव की कम शिक्षा के कारण उनसे गलती हुई। सोनू सूद जैसी हस्तियां भी मदद कर रही हैं।

Web Title : Rajpal Yadav's mistake due to less education: Priyadarshan's statement.

Web Summary : Rajpal Yadav faces jail for a check bounce case. Director Priyadarshan supports him, citing Yadav's talent and offering roles despite his financial struggles. Priyadarshan believes Yadav's lack of education led to his error. Celebrities like Sonu Sood are also helping.