'सैयारा'मधील 'त्या' सीनमुळे वाढलेली मोहित सुरींची डोकेदुखी! महेश भट्ट यांचा सल्ला कामी आला अन् गेमच बदलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 10:36 IST2025-08-14T10:33:56+5:302025-08-14T10:36:35+5:30
'सैयारा'मधील 'त्या' सीनमुळे वाढलेली मोहित सुरींची डोकेदुखी! महेश भट्ट यांचा सल्ला कामी आला

'सैयारा'मधील 'त्या' सीनमुळे वाढलेली मोहित सुरींची डोकेदुखी! महेश भट्ट यांचा सल्ला कामी आला अन् गेमच बदलला
Mohit Suri On Saiyaara: मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अजूनही प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता अहान पांडे आणि अनीत पड्डा हे नवोदित कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. मोहित सुरी यांच्या कारकिर्दीतील हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. प्रदर्शनाच्या २७ दिवसानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तग धरुन कायम आहे. याचदरम्यान, दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक मोहित सुरी यांनी चित्रपटासंबधित किस्से शेअर केले आहेत.
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत मोहित सुरी यांनी सैयारामधील एक सीनसाठी महेश भट्ट यांची मदत घेतली होती, असं सांगितलं. महेश भट्ट हे मोहित सुरी यांचे मामा आहेत. त्यांनी आजवर बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. शिवाय महेश भट्ट यांना ते आपला गुरू मानतात. त्याविषयी सांगताना मोहित सुरी म्हणाले की.,"सैयारा'मध्ये एक सीन आहे ज्यामध्ये अहान म्हणजे क्रिश कपूर त्याच्या वडिलांसोबत चुकीच्या पद्धतीने वागतो. नशेत असलेल्या आपल्या वडिलांवर क्रिश रागावतो. त्याला परिस्थितीचं भान राहत नाही. सुरुवातीला हा सीन शूट करण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यासाठी मी महेश भट्ट यांना सकाळी ७ वाजता फोन केला आणि त्यांना स्क्रिप्ट ऐकवली."
महेश भट्ट यांचा सल्ला ठरला फायदेशीर...
यासंदर्भात सांगताना ते म्हणाले, "त्यानंतर महेश भट्ट मला तो सीन समजावून सांगताना म्हणाले की, ज्यापद्धतीने तुझं आणि तुझ्या मुलामध्ये बॉण्ड आहे तशा इमोशन्स या सीनमध्ये अॅड कर. तो सीन चुकीचा होणार नाही. मुलगा आणि वडिलांच्या नातं हे फार पवित्र असतं. जसं तुला वाटतंय त्याच पद्धतीने सीन शूट कर असा सल्ला त्यांनी मला दिला." मोहित सुरी यांनी महेश भट्ट यांचा सल्ला तो मानला आणि तोच सीन सर्वाधित पसंतीस उतरला. विशेष म्हणजे त्या सीनचं आदित्य चोप्रा यांनी देखील कौतुक केलं.
'सैयारा'च्या निमित्ताने पुन्हा एक प्रेमकथा बॉलिवूडला गवसली आहे. आपल्या आवाजाला ओळख मिळावी यासाठी कायम प्रयत्नशील असलेला क्रिश कपूर प्रेक्षकांना भावला आहे. या चित्रपटाने जगभरात ५०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे.