मेघना गुलजार यांच्या नव्या प्रोजेक्टमधून आयुषमान खुरानाचा पत्ता कट; 'हा' साऊथ स्टार करीनासोबत करणार स्क्रिन शेअर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 14:18 IST2024-11-05T14:14:09+5:302024-11-05T14:18:11+5:30

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शिका मेघना गुलजार त्यांच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आहेत.

bollywood director meghna gulzar upcoming movie south star prithviraj sukumaran replacing ayushmann khurana share screen with kareena kapoor  | मेघना गुलजार यांच्या नव्या प्रोजेक्टमधून आयुषमान खुरानाचा पत्ता कट; 'हा' साऊथ स्टार करीनासोबत करणार स्क्रिन शेअर 

मेघना गुलजार यांच्या नव्या प्रोजेक्टमधून आयुषमान खुरानाचा पत्ता कट; 'हा' साऊथ स्टार करीनासोबत करणार स्क्रिन शेअर 

Meghna Gulzar : प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शिका मेघना गुलजार (Meghna Gulzar) त्यांच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आहेत. अभिनेत्री करीना कपूर त्यांच्या या प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार आहे. मेघना यांनी चित्रपटात आयुषमान खुरानाची (Ayushmann khurana)लीड रोलसाठी निवड केली होती. परंतु बिझी शेड्यूलमुळे अभिनेत्याने  ऑफर नाकारल्याचं कळतंय. त्यानंतर आता एका साऊथ सुपरस्टारची त्यांच्या आगामी चित्रपटामध्ये वर्णी लागली आहे. 

'इंडिया टूडे'च्या रिपोर्टनुसार, मेघना गुलजार यांच्या आगामी चित्रपटात साऊथ स्टार, सालार फेम अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांची एन्ट्री झाली आहे. या चित्रपटात अभिनेता एका पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार 'दायरा' असं या चित्रपटाचं नाव सांगण्यात येतंय. अभिनेत्री करीना कपूरसोबत पृथ्वीराज स्क्रिन शेअर करणार आहे. 

आयुष्यमान- सिद्धार्थ मल्होत्राने नाकारली ऑफर 

पहिल्यांदा या प्रोजेक्टकरिता अभिनेता आयुषमान खुराना तसेच सिद्धार्थ मल्होत्राची निवड करण्यात आली होती. परंतु दोघांच्याही तारखा फिक्स नसल्यामुळे त्यांनी ही ऑफर नाकारली. आयुषमान खुराना 'बॉर्डर-२ ' व्यतिरिक्त आणखी दोन प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे, ज्यासाठी तो लवकरच काम सुरू करणार आहे. त्यानंतर  पृथ्वीराज सुकुमार या रोलसाठी अप्रोच करण्यात आलं. चित्रपटाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर अभिनेत्याने होकार दिला. 

मेघना गुलजार एका सत्य घटनेवर आधारित नवा चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. मेघना गुलजार यांनी 'राजी', 'तलवार' आणि 'सॅम बहादूर' यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. अद्याप या चित्रपटाबद्दल कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. 

Web Title: bollywood director meghna gulzar upcoming movie south star prithviraj sukumaran replacing ayushmann khurana share screen with kareena kapoor