दीपिका पादुकोणसोबत काम करण्यास हा बॉलिवूडचा दिग्दर्शक उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 06:16 AM2018-01-11T06:16:44+5:302018-01-11T11:46:44+5:30

इरफान खान आणि दीपिका पादुकोणला घेऊन आगामी चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक विशाल भारव्दाजचे म्हणणे आहे की ते दीपिका सोबत ...

Bollywood director keen to work with Deepika Padukone | दीपिका पादुकोणसोबत काम करण्यास हा बॉलिवूडचा दिग्दर्शक उत्सुक

दीपिका पादुकोणसोबत काम करण्यास हा बॉलिवूडचा दिग्दर्शक उत्सुक

googlenewsNext
फान खान आणि दीपिका पादुकोणला घेऊन आगामी चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक विशाल भारव्दाजचे म्हणणे आहे की ते दीपिका सोबत काम करण्यास उत्सुक आहेत. कारण दीपिका त्यांची आवडती अभिनेत्री आहे. चित्रपटाचे नाव अजून नक्की करण्यात आले नाही. या चित्रपटाबाबत विशाल सांगतात, या चित्रपटाची पटकथा मी एक-दोन वर्षांपूर्वी लिहिली होती मात्र त्याला आता मी तो दिग्दर्शित करतो आहे. मी दीपिकासोबत काम करण्यास खूप उत्सुक आहे. कारण मी माझ्या आवडत्या अभिनेंत्री पैकी एक आहे.  पुढे ते म्हणाले, ती एक सुंदर अभिनेत्री आहे आणि मला असे वाटते कॅमेऱ्याला ती आवडते. मी इरफान खानसोबत सुद्धा काम करण्यास उत्सुक आहे. खूप वेळानंतर इरफान खान मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मकबूल, सात खून माफ, हैदर सारख्या चित्रपटात त्याच्या छोट्या भूमिका होत्या. त्यामुळे मी खूष आहे इरफानसोबत जास्त वेळ काम करायला मिळणार आहे.  

हा चित्रपट एक सत्य घटनेवर आधारित आहे. रहिमा खान नावाची लेडी डॉन सपना दीदीच्या नावाने फेमस होती. रहीमाने आपल्या नवऱ्याच्या खूनचा बदला घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मारण्याचा प्लॉन आखला होता. मात्र यात तिचाच मृत्यू झाला. चित्रपटात रहिमाची भूमिका दीपिका पादुकोण साकारणार आहे. तर  मिळालेल्या माहितीनुसार इरफान त्याच्या या आगामी चित्रपटात डॉनची भूमिका साकारणार आहे. दीपिका पादुकोणचा आगामी चित्रपट 'सपना दीदी'मध्ये अभिनेता इरफान खान कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत दिसणार आहे. इरफानने याआधी अनेकवेळा डॉनच्या भूमिका केल्या आहेत पण पहिल्यांदाच तो मोठ्या पडद्यानर दाऊदची भूमिका करतो आहे. 

ALSO READ :   होणार सुनेच्या बर्थ डे ला रणवीरच्या आई-बाबांनी दिले 'हे' महागडे गिफ्ट

लवकरच दीपिकाचा संजय लीला भन्साळींचा पद्मावत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात दीपिकासह रणवीर सिंग आणि शाहिद कपूरची महत्त्वाची भूमिका आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून हा चित्रपटात वादात सापडला आहे. अखेर अक्षय कुमारच्या पॅडमॅनबरोबर हा चित्रपट रिलीज होणार आहे.  

Web Title: Bollywood director keen to work with Deepika Padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.