बॉलिवूड सेलिब्रिटींच्या महागड्या कार्स...पाहा, सेलिब्रिटींचा लॅव्हिश अंदाज...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 17:04 IST2017-09-19T11:34:08+5:302017-09-19T17:04:08+5:30
अबोली कुलकर्णी बॉक्स आॅफिसवर चित्रपटाने कोटींच्या घरात गल्ला जमवला की, सेलिब्रिटीच्या घरासमोर महागडी कार आलीच म्हणून समजा. विश्वास बसत ...
.jpg)
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या महागड्या कार्स...पाहा, सेलिब्रिटींचा लॅव्हिश अंदाज...
बॉक्स आॅफिसवर चित्रपटाने कोटींच्या घरात गल्ला जमवला की, सेलिब्रिटीच्या घरासमोर महागडी कार आलीच म्हणून समजा. विश्वास बसत नाही ना, हे आम्ही नाही तर सेलिब्रिटींच्या कार्सचे आकडेच सांगत आहेत. जास्तीत जास्त महागडी आणि लॅव्हिश कार आपल्याकडे असावी असं प्रत्येकच सेलिब्रिटीला वाटत असतं. एवढंच नाही तर हे सेलिब्रिटी कार एकमेकांना बर्थडे, अॅनिव्हर्सरीज यांसाठी एकमेकांना गिफ्ट करतानाही दिसतात. चला तर मग पाहूयात, बॉलिवूडच्या कोणकोणत्या कलाकारांकडे आहेत महागड्या आणि लॅव्हिश कार...
अमिताभ बच्चन
बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांना कार्सची खूप आवड आहे. त्यांच्याकडे ‘अ बेंटली काँन्टिनेंटल जीटी’,‘अ मर्सिडिज एसएल५००’,‘अ रेंज रोव्हर’,‘अ लेक्सस एलएक्स४७०’,‘अ मर्सिडिस इ २४०’, ‘अ बीएमडब्ल्यू एक्स ५’ अशा वेगवेगळया देशी-परदेशी कंपन्यांच्या कार्स त्यांच्याकडे आहेत. ‘रोल्स रॉयस फँटम’ ही कार त्यांना ‘एकलव्य’ चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयावर खूश होऊन विधू विनोद चोप्रा यांनी गिफ्ट केली आहे.
शाहरूख खान
बॉलिवूडचा किंग बादशाह शाहरूख खान हा कारप्रेमी हे तर आपल्याला माहितीच आहे. त्याच्याकडे ‘बीएमडब्ल्यू १८’ ही महागडी कार आहे. शाहरूख हा बॉलिवूडच्या सगळ्यांत महागड्या कार असलेल्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. त्याच्याकडे ‘बीएमडब्ल्यू कन्व्हर्टिबल’,‘रोल्स रॉयस फँटम’,‘बेंटले काँन्टिनेंटल जीटी’,‘मिस्तुबिशी पाजेरो’,‘लँड क्रुझर’,‘बीएमडब्ल्यू ६ सीरिज’,‘आॅडी क्यू ६’ ‘बीएमडब्ल्यू ७ सीरिज’ या सर्व कंपन्यांच्या कार्स त्याच्याकडे आहेत.
प्रियांका चोप्रा
बॉलिवूडची देसी गर्ल ही बॉलिवूडची अशी एकमेव अभिनेत्री आहे जिने ‘रोल्स रॉयस’चे मॉडेल खरेदी केले आहे. त्याशिवाय तिने ‘बीएमडब्ल्यू ७’सीरिजची ‘मर्सिडिज बेंज ई-क्लास’ आणि ‘पोर्श्च केनी’ यांची खरेदी केली आहे. तिच्याकडे असलेल्या महागड्या कारपैकी ‘रोल्स रॉयस’ ही २ कोटींची महागडी ही कार आहे.
जॉन अब्राहम
बॉलिवूडचा कोणता अभिनेता बाईकवेडा आणि कारवेडा आहे असे विचाराल तर बॉलिवूडच्या एकाच अभिनेत्याचे नाव आपल्याला आठवेल ते म्हणजे जॉन अब्राहम. ‘मारूती जिप्सी’ आणि ‘ब्लॅक लाम्बोरगिनी’ या दोन कोटींच्या कार्स त्याच्यासाठी प्राणापेक्षाही प्रिय आहेत. बाईकसोबतच त्याने यामाहा आर १ ही देखील खरेदी केली आहे.
सलमान खान
सलमान खानलाही कार्स आणि बाईक्स यांचे खूप वेड आहे. अनेकदा तो चित्रपटांमध्येही बाईक किंवा कार चालवताना दिसला आहे. लक्झरी कार आणि बाईक्सवरून रपेट मारणे हे सल्लूमियाँचे आवडीचे काम आहे. त्याच्याकडे ‘बीएमडब्ल्यू एक्स ६’, ‘लँड रोव्हर’, ‘रेंज रोव्हर व्होग’ आणि ‘आॅडी आर ८’ या कार्स आहेत. ‘लेक्सस एलएक्स ५७०’ हिची किंमत जवळपास दीड कोटीच्या घरात आहे.