बॉलीवूड सेलिब्रेटींनी दिला ओम पुरींना भावपूर्ण निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 11:54 IST2017-01-07T11:52:41+5:302017-01-07T11:54:08+5:30
जेष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे शुक्रवारी (दि. ६) हृदयविकाऱ्याच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मुंबई येथील त्यांच्या राहत्या घरात वयाच्या ...

बॉलीवूड सेलिब्रेटींनी दिला ओम पुरींना भावपूर्ण निरोप
ज ष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे शुक्रवारी (दि. ६) हृदयविकाऱ्याच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मुंबई येथील त्यांच्या राहत्या घरात वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही बातमी कळताच बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली. अनेक सेलिब्रेटींनी वृत्तपत्रे आणि सोशल साईटस्वर ओम पुरींच्या आठवणींना उजाळा दिला.
ओशिवारा भागातील स्मशानभूमीमध्ये काल संध्याकाळी मुलगा इशानच्या हस्ते त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी इंडस्ट्रीमधील अनेक मान्यवर मंडळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. जावेद अख्तर, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, इरफान खान, सुधीर मिश्रा, कबीर खान, शबाना आझमी, पत्नी नंदिता, जॉनी लिव्हर, विद्या बालन, पंकज कपूर, सुप्रिया पाठक, जेष्ठ अभिनेते शशी कपूर, अनिल कपूर, रत्ना पाठक, विवान शहा आदी कलाकार यावेळी हजर होते.
![Big B at Om Puri Funeral]()
अमिताभ बच्चन
![Sudhir Mishra and Irrfan Khan at Om Puri Funeral]()
सुधीर मिश्रा आणि इरफान खान
![Abishek at Om Puri Funeral]()
अभिषेक बच्चन
![Johnny at Om Puri Funeral]()
जॉनी लिव्हर
![Vidya at Om Puri Funeral]()
विद्या बालन
![Kabir Khan at Om Puri Funeral]()
कबीर खान
![Pankaj at Om Puri Funeral]()
पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक
![Shashi at Om Puri Funeral]()
शशी कपूर
![Anil at Om Puri Funeral]()
अनिल कपूर
![Ratna and Vivaan at Om Puri Funeral]()
रत्ना पाठक आणि विवान शहा
![Javed at Om Puri Funeral]()
जावेद अख्तर
![Shabana at Om Puri Funeral]()
शबाना आझमी
![Nandita at Om Puri Funeral]()
नंदिता पुरी
![Ishan at Om Puri Funeral]()
मुलगा इशान पुरी
एक हरहुन्नरी आणि पूरिपूर्ण अभिनेता गमावल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली. ओम पुरी यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांचे खासगी जीवन नेहमीच वादग्रस्त राहिले. सामाजिक विषयावर टीकाटिप्पणी करण्यामुळे ते अनेकदा वादात अडकले होते.
सुत्रांनुसार ओम पुरी यांचा मृत्यू जरी हृदयविकाराच्या झटक्याने झाला असला तरी त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूवर दुखापत झालेली होती. त्याचे कारण शोधण्यासाठी या प्रकारणाची पोलिस चौकशी करणार आहेत. घराचा पंचनामा केला असता घरामध्ये दारूच्या बाटल्या मिळाल्या आहेत. मृत्यू होण्याच्या आदल्या दिवशीसुद्धा त्यांनी मद्यपान केले होते अशी माहिती देण्यात आली आहे. ‘आम्ही सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करणार आहोत, सोबतच त्यांच्याकडे येणाऱ्या-जाणाऱ्याची चौकशी केली जाणार आहे, गरज पडल्यास नंदिती नंदिता पुरी यांची देखील चौकशी केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.