जामनगरमध्ये अनंत अंबानींसह भाईजानने वाजवला ड्रम, 'छम्मक छल्लो' गाण्यावर सेलिब्रिटींची धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 12:45 IST2024-03-04T12:44:11+5:302024-03-04T12:45:46+5:30

'छम्मक छल्लो' गाणारा अमेरिकन गायक एकॉन स्वत: अंबानींच्या पार्टीत हजर होता. सलमान खानसोबत त्याने ड्रम वाजवला.

Bollywood celebrities bang on Chhammak Chhallo song Salman Khan played drum | जामनगरमध्ये अनंत अंबानींसह भाईजानने वाजवला ड्रम, 'छम्मक छल्लो' गाण्यावर सेलिब्रिटींची धमाल

जामनगरमध्ये अनंत अंबानींसह भाईजानने वाजवला ड्रम, 'छम्मक छल्लो' गाण्यावर सेलिब्रिटींची धमाल

Ambani PreWedding: शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'रा वन' सिनेमातील 'छम्मक छल्लो' गाण्याची क्रेझ कायम आहे. जामनगर येथे झालेल्या अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्यात या गाण्यावर सर्वच थिरकले. 'छम्मक छल्लो' गाणारा अमेरिकन गायक एकॉन स्वत: अंबानींच्या पार्टीत हजर होता. त्याच्या लाईव्ह परफॉर्मन्सवर अख्खं बॉलिवूड अंबानी कुटुंबासह थिरकलं. यावेळी बॉलिवूडचा भाईजान सलमान खान ड्रम वाजवताना दिसला. तर अंबानींची होणारी सून राधिकाही एकॉनसोबत नाचताना दिसली.

१ ते ३ मार्च असे ३ दिवस झालेल्या अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्याचीच चर्चा देशभरात होती. अगदी हॉलिवूड स्टार, जगभरातील दिग्गज या सोहळ्याला आमंत्रित होते. अमेरिकन गायक एकॉनने छम्मक छल्लो गाण्याने बहार आणली.  यावेळी शाहरुख सलमानने एकत्र येत डान्स केला. सलमानने (Salman Khan) तर ड्रम वाजवत पार्टीची शोभा वाढवली. सर्वच लोक अगदी बेधुंद होऊन नाचत होते. स्टेजवर एकॉनसोबतच सुहाना खान, गौरी खान, राधिका मर्चंट, शनाया कपूर हे देखील होते. अनंत अंबानींनी तर सलमान खानला उचलून घेण्याचाही प्रयत्न केला. पण जेव्हा त्याला हे जमलं नाही तेव्हा शेराने सलमानला उचलले. यानंतर अनंत अंबानींना आनंद झाला. 

काल शेवटच्या दिवशी सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक गायक, गायिकांनी रंगत आणली. अरिजीत सिंह, श्रेया घोषाल, सुखबीर सिंह, सुखविंदर, नीति मोहन, उदित नारायण, शान, मोहित चौहान यांनी लाईव्ह परफॉर्मन्स दिले. याआधी १ मार्च रोजी पहिल्याच दिवशी हॉलिवूड स्टार गायिका रिहानाच्या कॉन्सर्टने धूम आणली होती. 

Web Title: Bollywood celebrities bang on Chhammak Chhallo song Salman Khan played drum