बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रींचे मानधन आहे सर्वाधिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 15:06 IST2017-07-08T09:36:45+5:302017-07-08T15:06:45+5:30
बॉलिवूडमध्ये अनेकांची मानधन कोट्यवधींच्या घरात आहेत या रेसमध्ये अभिनेत्री ही मागे नाहीत आहेत. बॉलिवूडमध्ये अशा टॉपच्या अभिनेत्री आहेत ज्यांचे ...

बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रींचे मानधन आहे सर्वाधिक
ब लिवूडमध्ये अनेकांची मानधन कोट्यवधींच्या घरात आहेत या रेसमध्ये अभिनेत्री ही मागे नाहीत आहेत. बॉलिवूडमध्ये अशा टॉपच्या अभिनेत्री आहेत ज्यांचे मानधन कोट्यवधींच्या जवळपास आहेत. या अभिनेत्रींनी बॉलिवूडमधले पुरुषांचे वर्चस्व मोडून काढले आहे. कोण आहे या अभिनेत्री टाकूया यावर एक नजर...
दीपिका पादुकोण
दीपिका सध्या बॉलिवूडमधील नंबर 1 ची अभिनेत्री आहे. सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांच्या यादीत सुद्धा तिचा पहिला क्रमांक आहे. बाजीराव मस्तानी, पिकू, ये जवानी ये दिवानी ह्या सारखे अनेक हिट चित्रपट तिने बॉलिवूडला दिले आहेत. दीपिका एका चित्रपटासाठी साधारणतः १०-१२ कोटींचे मानधन घेते.
![]()
कंगना रणौत
बॉलिवूडची क्वीन अशी जिची ओळख आहे ती म्हणजे अर्थात कंगना रणौत. कंगनाने मोजकेच चित्रपट केले मात्र तरीही तिच्याकडे चित्रपटांची सध्या रांग आहे. तन्नू वेड्स मन्नुमध्ये तिनी तिची अभिनय क्षमता जगाला दाखवून दिली. तर क्वीनमधून ती एकटीच चित्रपट हिट करू शकते हे तिने सिद्ध केले. तिने सध्या एक चित्रपट साइन केला त्यासाठी तिने ११ कोटी घेतले आहेत.
![]()
करिना कपूर
बॉलिवूडची बेबो करिना कपूर गेल्या 15 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत काम करते आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत तिचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. करिनाने लग्नानंतरही चित्रपटांमध्ये आपला ठस्सा कायम ठेवला. मात्र आई झाल्यानंतर चित्रपटातून ब्रेक घेतला आहे. पण ती लवकरच कामावर परतणार असल्याचे समजते आहे. करिनाने उडता पंजाब आणि कभी खुशी कभी गम या चित्रपटासाठी ९-१० कोटी आकारले होते.
![]()
प्रियांका चोप्रा
प्रियांका सध्या बॉलीवूड आणि हॉलिवूड दोन्हीकडे प्रसिद्ध आहे. तिने निर्माती क्षेत्रात ही पदार्पण केले आहे. अनेक प्रादेशिक चित्रपटाची निर्मिती तिच्या प्रॉडक्शन हाऊसने केली आहे. व्हेंटिलिटर या तिच्या प्रॉडक्शन हाऊसखाली तयार झालेल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. प्रियांका प्रत्येक चित्रपटासाठी ८-९ करोड मानधन घेते.
![]()
विद्या बालन
विद्याने इंडस्ट्रीतील नावाजलेल्या दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. डर्टी पिक्चर हा चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. तिने आतापर्यंत केलेल्या चित्रपटात तिची भूमिका नेहमीच वेगळी होती. विद्या ६-७ करोड मानधन प्रत्येक चित्रपटासाठी घेते.