एका चित्रपटामुळे पालटलं 'या' अभिनेत्रीचं नशीब; आता मानधन घेते कोटींंच्या घरात, आकडा वाचून येईल भोवळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 17:18 IST2024-09-18T17:15:58+5:302024-09-18T17:18:53+5:30
बॉलिवूडची ही अभिनेत्री दहा महिन्यांपूर्वी एका चित्रपटासाठी जवळपास ४० लाख रुपये इतकं मानधन घेत होती. पण, सध्या ती एका चित्रपटासाठी कोटींच्या घरात मानधन घेत असल्याचं सांगितंल जातंय.

एका चित्रपटामुळे पालटलं 'या' अभिनेत्रीचं नशीब; आता मानधन घेते कोटींंच्या घरात, आकडा वाचून येईल भोवळ
Triptii Dimri : बॉलिवूड कलाकार त्यांच्या अभिनयासह चित्रपट आणि त्यांच्या कमाईमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. हिंदी सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्यांना मिळणारं मानधन हे अभिनेत्रींपेक्षा अधिक असतं. परंतु काळानुसार हे चित्र बदलत चाललं आहे. सध्याच्या घडीला बॉलिवूडच्या अभिनेत्री त्यांच्या सहकलाकाराला चित्रपटांसाठी जेवढं मानधन मिळतं त्या इतकंच मानधन घेतात. अशाच एका अभिनेत्रीचं नशीब फळफळलं आहे. अवघ्या १० महिन्यांच्या कालावधीत तिच्या मानधनात कमालीची वाढ झालेली पाहायला मिळते आहे. ही अभिनेत्री म्हणजे तृप्ती डिमरी आहे.
अलिकडेच विकी कौशल - तृप्ती डिमरी यांची प्रमुख भूमिका असलेला 'बॅड न्यूज' सिनेमा लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही १०० पेक्षा जास्त कोटींचा व्यवसाय केला. त्यामुळे तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली. याशिवाय 'अॅनिमल' या सिनेमात तिने केलेल्या कामामुळे ती चर्चेत आली. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने तिला खऱ्या अर्थाने नवी ओळख मिळवून दिली.
'अॅनिमल' मध्ये तृप्तीने रियाज नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. शिवाय चित्रपटात तिने रणबीर कपूरसोबत रोमांस करताना दिसली. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने या सिनेमासाठी ४० लाख रुपये इतकं मानधन घेतल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर तृप्ती अलिकडेच विकी कौशलसोबत 'बॅड न्यूज' या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसली. त्यासाठी तिने ८० लाख इतकी फीस आकारली.
महिनाभरापूर्वी लाखोंच्या घरात मानधन घेणाऱ्या या अभिनेत्रीने तिची फी वाढवल्याचं सांगण्यात येतंय. सध्याच्या घडीला तृप्ती डिमरी एका चित्रपटासाठी १० कोटी इतकी रक्कम मानधन स्वरूपात आकारते.
तृप्ती डिमरीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, आता ती अभिनेता राजकुमार रावसोबत विकी विद्या का वो वाला व्हिडीओ या सिनेमात काम करताना दिसणार आहे.