"तो आजही सकाळी...", २५ वर्षानंतरही अक्षय कुमारच्या 'या' सवयी कायम, तब्बूने केला खुलासा, म्हणाली....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:16 IST2025-11-18T17:12:47+5:302025-11-18T17:16:02+5:30
अक्षय कुमारच्या 'त्या' सवयींबद्दल तब्बूचा खुलासा, म्हणते- "तो पार्ट्यांना..."

"तो आजही सकाळी...", २५ वर्षानंतरही अक्षय कुमारच्या 'या' सवयी कायम, तब्बूने केला खुलासा, म्हणाली....
Tabbu Talk About AKshay Kumar: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या अभिनयासह शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी देखील तितकाच ओळखला जातो. ठरलेल्या वेळी ठरलेल्या गोष्टी करणे, व्यायामाकडे लक्ष देणे, आहाराकडे लक्ष देणे या गोष्टींबाबत बॉलीवूडच्या खिलाडी कुमारने अनेकदा वक्तव्य केले.अनेकदा अक्षयच्या दिनश्चर्यबद्दल त्याचे इतर सहकलाकारही बोलताना दिसतात. अक्षय रोज पहाटे चार वाजता उठतो आणि बी-टाउनमधील कोणत्याही पार्ट्यांमध्ये तो सहभागी होत नाही. अशातच लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने अक्षयच्या दिनश्चर्येबद्दल खुलासा केला आहे.
अक्षय कुमार लवकरच 'भूत बंगला' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री तब्बू देखील प्रमुख भूमिकेत आहे. जवळपास २५ वर्षांपूर्वी अक्षय-तब्बूची जोडी 'तू चोर मैं सिपाही'चित्रपटात एकत्र झळकली होती. त्यानंतर आता ते 'भूत बंगला'च्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. याचदरम्यान, दिलेल्या एका मुलाखतीत तब्बूने अक्षय कुमारच्या २५ वर्षांपू्र्वीच्या सवयींबद्दल खुलासा केलाय. त्यादरम्यान, अभिनेत्री म्हणाली, "त्याची विनोद करण्याची पद्धत आणि एनर्जी पूर्वीसारखीच आहे.तो नेहमी म्हणतो, लवकर झोपा, आणि तो पार्ट्यांमध्ये जात नाही. अक्षय अजूनही पहाटे ४ वाजता उठतो."
त्यानंतर अक्षय कुमारसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल तब्बू म्हणाली,"तो लवकर काम संपवून घरी जातो. या त्याच्या सवयींमध्ये इतक्या वर्षानंतरही बदल झालेला नाही.आम्ही सगळे मोठे झालो आहोत, पण त्याच्यातील ती गोष्ट कायम आहे."