"कॉलेजला गेली नाही, कारण...", बॉलिवूड गाजवणारी शिल्पा शिरोडकर किती शिकलीये? स्वत: च केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 17:54 IST2025-06-16T17:51:26+5:302025-06-16T17:54:53+5:30

बॉलिवूड गाजवणारी शिल्पा शिरोडकर दहावीत दोनदा झालीये नापास; अभिनेत्रीने स्वत: च केला खुलासा

bollywood actress shilpa shirodkar reveals about how much she studied says i didn't go to college because | "कॉलेजला गेली नाही, कारण...", बॉलिवूड गाजवणारी शिल्पा शिरोडकर किती शिकलीये? स्वत: च केला खुलासा

"कॉलेजला गेली नाही, कारण...", बॉलिवूड गाजवणारी शिल्पा शिरोडकर किती शिकलीये? स्वत: च केला खुलासा

Shilpa Shirodkar: ९० च्या दशकातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सेन्सेशनल क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar). अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून तिने विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय अलिकडेच ती बिग बॉस हिंदीच्या १८ व्या पर्वात झळकली. आपल्या दमदार खेळीने तिने सर्वांचीच मनं जिंकली होती. दरम्यान, बॉलिवूड गाजवणाऱ्या या अभिनेत्रीचं शिक्षण किती झालं आहे? याबद्दल स्वत: शिल्पा शिरोडकरने खुलासा केला आहे.


नुकतीच शिल्पा शिरोडकरने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती शिक्षणाबाबत खुलासा करत म्हणाली, "पाली हिलमध्ये  माझं शिक्षण झालं. मी कॉलेजलाही गेली नाही कारण माझं करिअर खूप लवकर सुरू झालं आणि त्याच्यामुळे दहावीची परीक्षा पण मी पहिल्यांदा दिली तेव्हा नापास झाले. म्हणून मी पुन्हा दुसऱ्यांदा पुरवणी परीक्षा दिली. पण  पुरवणी परीक्षा दिल्यानंतर तेव्हा मी काम करत होते. त्यावेळी पुरवणी परीक्षेत देखील मी विज्ञान आणि गणित विषयात नापास झाले. "

त्यानंतर अभिनेत्रीने सांगितलं, "तेव्हा माझी आई नेहमी म्हणायची तू तिसऱ्यांदा केलंस ना तर तू नक्कीच पास होशील मी म्हंटल नको, मला आता माफ करा, आता मी काम करते मी दोन्ही गोष्टी नाही करू शकत. म्हणून मला अभ्यास सोडायला लागला. पण, देवाच्या कृपेने मला या इंडस्ट्रीने एवढं दिलं की कधी असं वाटलं नाही की शिक्षण संपवायला हवं होतं. मला असं वाटतं की मी असं करिअर म्हणून असं क्षेत्र निवडलं, ज्यासाठी मला शिक्षण पूर्ण करण्याची गरज वाटली नाही." असं म्हणत अभिनेत्रीने तिच्या शिक्षणाविषयी वक्तव्य केलं आहे. 

शिल्पा शिरोडकरच्या करिअरविषयी सांगायचं तर तिने 'आँखें', 'गोपी किशन', 'खुदा गवाह', 'हम'  यासारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच तिने 'एक मुठ्ठी आसमान' या मालिकेतही भूमिका साकारली आहे. अमिताभ बच्चन, मिथून चक्रवर्ती ते शाहरुख खान अशा सर्वच अभिनेत्यांसोबत शिल्पा शिरोडकर अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. 

Web Title: bollywood actress shilpa shirodkar reveals about how much she studied says i didn't go to college because

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.