वजनामुळे रिजेक्ट केलं, जाड असल्यामुळे हिणवलं; ९० चे दशक गाजवणाऱ्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 04:32 PM2024-02-09T16:32:09+5:302024-02-09T16:34:29+5:30

अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिरोडकर हे नाव सिनेरसिकांना नवं नाही.

Bollywood actress shilpa shirodkar reveals about her film industry journey | वजनामुळे रिजेक्ट केलं, जाड असल्यामुळे हिणवलं; ९० चे दशक गाजवणाऱ्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?

वजनामुळे रिजेक्ट केलं, जाड असल्यामुळे हिणवलं; ९० चे दशक गाजवणाऱ्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?

Shilpa Shirodkar : ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य  करणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिरोडकर. हिंदी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार सिनेमे देत शिल्पाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. 

आपल्या करिअरमध्ये शिल्पा शिरोडकरने गोविंदा, श्रीदेवी यांसारख्या बड्या कलाकारांसोबत काम केलं. जवळपास १० वर्ष अभिनय क्षेत्रात सक्रिय असलेल्या या नायिकेने अचानक बॉलिवूडला रामराम केला. फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनुभवी कलाकारांसोबत काम करुनही अभिनेत्रीच्या पदरी निराशाच आली. बऱ्याचदा तिला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

एका मुलाखतीत तिने बॉलिवूडबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले.शिल्पा आज जरी बॉलिवूडपासून दूर असली तरी तिच्या अनेक गोष्टी आजही बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय असतात.

माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने काही प्रसंगांचा उल्लेख केला. सिनेसृष्टीत काम करताना तिला आलेल्या कटू अनूभवांवर शिल्पाने भाष्य केल्याचं पाहायला मिळालं. अनेकदा काही लोक शिल्पाला तिच्या शरीरयष्टीवरून हिणवायचे.

त्याचबरोबर शिल्पा शिरोडकरने सांगितले की, शाहरुख खानसोबत छैया-छैया हे गाणे तिला पहिल्यांदा ऑफर करण्यात आले होते. मात्र वाढलेल्या वजनामुळे तिला रिजेक्ट करण्यात आलं. मलायका अरोराआधी शिल्पाची निवड या गाण्यासाठी करण्यात आली होती. पण ऐनवेळेस तिला या गाण्यातून बाहेर केलं असं तिने म्हटलं.

मिथुन चक्रवर्ती यांनी केली मदत :

मिथुन चक्रवर्ती यांनी शिल्पा शिरोडकरला नेहमीच मदत केल्याचं ती सांगते. शिल्पा इंडस्ट्रीमध्ये येण्यामागे मिथुन दा यांचा मोठा वाटा होता असं ती म्हणते. एकवेळ अशी होती जेव्हा 'सौतन की बेटी' आणि 'जंगल' यांसारखे सिनेमे तिच्याकडून काढून घेण्यात आले, तेव्हा लोक अभिनेत्रीला अपशकुनी म्हणायला लागले. पण मिथुन होते ज्यांनी मला 'भ्रष्टाचार' मध्ये भूमिका मिळवून दिली आणि माझ्या करिअरची सुरुवात झाली अशी माहिती शिल्पाने माध्यमांना दिली. 

Web Title: Bollywood actress shilpa shirodkar reveals about her film industry journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.