शूटिंग सुरु झालं अन् लाईटमुळे पाठ जळाली....; शिल्पा शेट्टीसोबत घडलेली भयंकर घटना, सांगितला 'तो' भयावह प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 10:59 IST2026-04-12T10:55:07+5:302026-04-12T10:59:17+5:30
शूट सुरु असतानाच अचानक...; शिल्पा शेट्टीसोबत घडलेलं असं काही; अभिनेत्री म्हणाली...

शूटिंग सुरु झालं अन् लाईटमुळे पाठ जळाली....; शिल्पा शेट्टीसोबत घडलेली भयंकर घटना, सांगितला 'तो' भयावह प्रसंग
Shilpa Shetty : ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. आपल्या अभिनयासोबत फिटनेससाठी कायम चर्चेत असणारी शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.आजवर तिने असंख्य चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत.मात्र, तिचा हा प्रवास फार काही सोपा नव्हता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात शूटिंगच्या वेळी घडलेला एक भयंकर प्रसंग सांगितला.
अलिकडेच शिल्पा शेट्टी 'टुमॉरो, टुडे शो' या यूट्यूब चॅनेलला मुलाखती दिली. यादरम्यान ती म्हणाली,तिची कामाप्रती असलेली निष्ठा अनेक दिग्दर्शकांनी ओळखली होती. त्यामुळे मला अनेक चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, असं शिल्पाने सांगितलं.या मुलाखतीत एका वेदनादायी घटनेची आठवण सांगताना अभिनेत्री म्हणाली, "मला नेहमी काम मिळालं कारण लोकांनी माझी मेहनत पाहिली होती. मी नेहमी काम पूर्ण करत असे आणि कोणत्याही परिस्थिती का असेना सेटवर पोहोचायचे. एकदा शूटिंगदरम्यान माझी पाठ एचएमआय लाईटमुळे भाजली होती. मला फ्रेममधून बाहेर पडायचे होते आणि मागे एक छोटी लाईट होती. माझी पाठ त्याला लागली, त्यामुळे पाठ भाजली गेली."
त्यानंतर अभिनेत्रीने पुढे सांगितलं," जेव्हा भाजते तेव्हा लगेच कळत नाही, मात्र थोड्या वेळाने वेदना जाणवतात. तरीही मी दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर गेले. त्या दिवशी मला एक खास कॉस्ट्यूम घालायचा होता, पण पाठ भाजल्यामुळे तो व्यवस्थित घालता येत नव्हता. त्यामुळे मी तो फक्त पुढूनच घातला आणि मागून सुई-दोऱ्याने शिवून घेतला, त्यामुळे चैन लावण्याची गरज पडली नाही. माझ्यामुळे कोणालाही नुकसान होऊ नये म्हणून मी माझ्या आयुष्यात खूप मेहनत घेतलेली आहे."
शिल्पा शेट्टीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती अलिकडेच 'इंडियन पोलीस फोर्स' या वेबसिरीजमध्ये दिसली होती. या सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉय हे कलाकार देखील होते. लवकरच ती 'केडी द डेव्हील' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अभिनेता संजय दत्त महत्वाच्या भूमिकेत आहे.