'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला सतावतेय 'या' गोष्टीची भीती; भावुक झाली अभिनेत्री, म्हणाली... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 13:11 IST2025-08-08T13:05:35+5:302025-08-08T13:11:02+5:30

'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला सतावतेय 'या' गोष्टीची भीती; भावुक होत म्हणाली...

bollywood actress saiyaara movie fame aneet padda is worried about what is next the actress got emotional share post | 'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला सतावतेय 'या' गोष्टीची भीती; भावुक झाली अभिनेत्री, म्हणाली... 

'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला सतावतेय 'या' गोष्टीची भीती; भावुक झाली अभिनेत्री, म्हणाली... 

Aneet Padda  Raction On Saiyaara Success: अहान पांडे आणि अनीत पड्डा स्टारर 'सैयारा' चित्रपट १८ जुलैला सर्वत्र प्रदर्शित झाला.  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच 'सैयारा'ने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले आहेत. तरीही या चित्रपटाची अजूनही क्रेझ कायम आहे. फक्त भारतातच नाहीतर परदेशातही सैयाराला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. नव्या जोडीचा सिनेमा असूनही एवढं यश मिळणं ही मोठी बाब आहे. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून अभिनेत्री अनीत पड्डा भारावून गेली आहे. तिने रसिक प्रेक्षकांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे.


अभिनेत्री अनीत पड्डाने तिच्या सोशल सोशल मीडियावर अकांउंटवर सैयाराच्या सेटवरील फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. त्या पोस्टमध्ये तिने म्हटलंय, "मला फक्त इतकंच सांगायचं आहे की, माझं माझ्या रसिक प्रेक्षकांवर खूप प्रेम आहे. आपल्यापैकी कोणीही एकमेकांना फारसं ओळखतही नसेल. पण, आपल्यामध्ये एक प्रेमळ नातं निर्माण झालं आहे. तुम्ही मला दिलेलं प्रेम माझ्यावर एक जबाबदारीआहे आणि त्याची परतफेड कशी करावी हे मला समजत नाही. "

पुढे अनीतने लिहिलंय, "आता पुढे काय होईल? कसं होईल? याची मला भीती वाटतेय. तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे, तो मी पूर्ण करण्यास मी यशस्वी होते की नाही याची मनात भीती आहे. परंतु, माझ्याकडून मी जे काही शक्य आहे ते देण्याचा माझा प्रयत्न असेल. जर माझ्या कामाने तुम्हाला हसवलं, किंवा रडवलं, किंवा काही अशा गोष्टी आठवून दिल्या ज्या तुम्ही विसरून गेलात, किंवा जर त्यामुळे तुम्हाला एकटेपणा थोडाफार का होईना, कमी वाटला, तर मी  त्यांच्यासोबत आहे. जरी मी परिपूर्ण नसले तरी मनापासून मेहनत करत राहीन. कारण मी माझ्या प्रेक्षकांवर प्रेम करते...", अशा आशयाची पोस्ट अनीतने लिहिली आहे. 

'सैयारा' चित्रपटाचा अजूनही बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम आहे. अवघ्या ४५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. 

Web Title: bollywood actress saiyaara movie fame aneet padda is worried about what is next the actress got emotional share post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.