...म्हणून रिमी सेनने बॉलिवूडला केला रामराम; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "पुरुषप्रधान इंडस्ट्रीत..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:30 IST2026-01-24T15:21:50+5:302026-01-24T15:30:36+5:30
"चित्रपटसृष्टीतील करिअर फार काळ टिकत नाही, कारण...", प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा,'या' कारणामुळे सोडली इंडस्ट्री

...म्हणून रिमी सेनने बॉलिवूडला केला रामराम; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "पुरुषप्रधान इंडस्ट्रीत..."
Rimi Sen: 'हंगामा',' धूम' तसेच 'फिर हेरा फेरी' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी नायिका म्हणजे रिमी सेन.मात्र, प्रसिद्धीच्या शिखरावर असताना रिमीने इंडस्ट्रीला कायमचा रामराम केला. रिमी शेवटची २०११ मध्ये आलेल्या 'शागिर्द' चित्रपटात दिसली. गेली बरीच वर्षे रिमी दुबईत वास्तव्यास आहे, तिथे अभिनेत्रीने रिअर इस्टेटचा व्यवसाय सुरु केला आहे. अशातच अलिकडेच अभिनेत्रीने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये इंडस्ट्री सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे.
रिमीने बिल्डकॅप्स रिअल इस्टेट एलएलसी पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यादरम्यान, अभिनेत्री म्हणाली," मला वाटतं चित्रपटसृष्टीतील करिअर फार काळ टिकणारं नसतं. ही पुरुप्रधान इंडस्ट्री आहे. आजही या फिल्म इंडस्ट्रीत अभिनेते राज्य करत आहेत."
म्हणूनच मी आधीच ठरवलं होतं की…
"जवळपास २५-३० वर्षांनंतरही या क्षेत्रात सलमान आणि शाहरुख यांचा दबदबा कायम आहे. त्यांच्यासोबत ज्या अभिनेत्रींनी काम केलं आहे आज त्या सहाय्यक भूमिका किंवा चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारताना दिसतात.म्हणूनच मी आधीच ठरवलं होतं की मी काही काळ काम करेन. मी शक्य तितके पैसे कमवीन आणि नंतर निर्मिती क्षेत्रात जाईन."
रिमी पुढे म्हणाली, "मी बुधिया सिंहची निर्मिती केली, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण त्यानंतर मी व्यवसायात उतरलो.मला आता अधिक सुरक्षित वाटते. कॅमेऱ्यासमोर असण्याचा कोणताही दबाव नाही.शेवटी, आर्थिक आणि स्वातंत्र्य अधिक महत्त्वाचं असतं. असा खुलासा अभिनेत्रीने मुलाखतीत केला.