गुडन्यूज! ३९व्या वर्षी गरोदर आहे राधिका आपटे, रेड कार्पेटवर फ्लॉन्ट केला बेबी बंप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 09:33 IST2024-10-17T09:32:01+5:302024-10-17T09:33:54+5:30
बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेच्या घरी पाळणा हलणार आहे. राधिका आपटे गरोदर आहे. ३९व्या वर्षी राधिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.

गुडन्यूज! ३९व्या वर्षी गरोदर आहे राधिका आपटे, रेड कार्पेटवर फ्लॉन्ट केला बेबी बंप
गेल्या काही दिवसांत कलाविश्वातून अनेक अभिनेत्रींनी गुडन्यूज दिली आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेच्या घरीदेखील पाळणा हलणार आहे. राधिका आपटे गरोदर आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत राधिकाने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. तिच्या या पोस्टने चाहत्यांना सुखद धक्का मिळाला आहे. ३९व्या वर्षी राधिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.
राधिका सिस्टर मिडनाईट या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाच्या प्रिमियरदरम्यान राधिकाने आई होणार असल्याची गुडन्यूज सगळ्यांसोबत शेअर केली आहे. या फिल्म फेस्टिव्हलसाठी राधिका काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसून आली. पण, लक्ष वेधून घेतलं ते तिच्या बेबी बंपने. रेड कार्पेटवर बेबी बंप फ्लॉन्ट करत राधिकाने आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली.
राधिकाच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही राधिकाच्या पोस्टवर करत तिचं अभिनंदन केलं आहे. राधिकाने २०१२ साली बेनेडिक्ट टेलरशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर आता १२ वर्षांनी ते आईबाबा होणार आहेत.