ही प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई! बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली चाहत्यांना 'गुड न्यूज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 16:02 IST2024-07-25T16:01:08+5:302024-07-25T16:02:46+5:30

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार असून सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय

bollywood actress pranita subhash announced pregnancy for second time | ही प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई! बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली चाहत्यांना 'गुड न्यूज'

ही प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई! बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली चाहत्यांना 'गुड न्यूज'

दाक्षिणात्य सिनेमांसोबतच बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी दुसऱ्यांदा आनंदाची बातमी येणार आहे. अभिनेत्री प्रणिता सुभाष दुसऱ्यांदा आई होणार असून तिने नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिलीय. प्रणिताने २०२२ साली मुलीला जन्म दिला होता. आता प्रणिता पुन्हा एकदा आई होणार असून तिने सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्ट करत खास फोटोशूट केलंय. (bollywood actress pranita subhash announced pregnancy for second time)

प्रणिता सुभाषने अशी दिली सर्वांना गुड न्यूज

प्रणिता सुभाषने तिच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांना ही गुड न्यूज दिलीय. "राऊंड २... पँट आता फिट बसत नाही" असं कॅप्शन देत प्रणिताने फोटो शेअर केले आहेत. ब्लॅक रंगाचं खास आऊटफिट परिधान करत प्रणिताने बेबी बंप फ्लॉन्ट केलाय. प्रणिताने फोटो पोस्ट करताच तिच्या चाहत्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. याशिवाय दुसऱ्यांदा आई होणार असल्याची गुड न्यूज दिल्याबद्दल चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलंय.  



प्रणिताचं वर्कफ्रंट

प्रणिताने ३० मे २०२१ ला कोरोना काळात लग्न केलं होतं. बिझनेसमन नितिन राजू हा प्रणिताचा पती आहे. प्रणिताने 'हंगामा २' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. याशिवाय अजय देवगणच्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या सिनेमातही प्रणिता झळकली होती. बॉलिवूडपेक्षा साऊथ इंडस्ट्रीत प्रणिताची जास्त लोकप्रियता आहे. तिने कन्नड, तेलुगु, तामिळ आणि मल्याळम सिनेमातही लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: bollywood actress pranita subhash announced pregnancy for second time