FIFA World Cup 2022: अतिउत्साहात भान गमावून बसली नोरा फतेही; तिरंग्याच्या 'अपमाना'वरून नेटकऱ्यांनी घेतली शाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 08:09 PM2022-12-01T20:09:16+5:302022-12-01T20:10:16+5:30

सध्या कतारच्या धरतीवर फिफा विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

Bollywood actress Nora Fatehi is being trolled after she insulted the Indian flag while performing on stage at the FIFA World Cup 2022 | FIFA World Cup 2022: अतिउत्साहात भान गमावून बसली नोरा फतेही; तिरंग्याच्या 'अपमाना'वरून नेटकऱ्यांनी घेतली शाळा

FIFA World Cup 2022: अतिउत्साहात भान गमावून बसली नोरा फतेही; तिरंग्याच्या 'अपमाना'वरून नेटकऱ्यांनी घेतली शाळा

googlenewsNext

नवी दिल्ली : सध्या कतारच्या धरतीवर फिफा विश्वचषकाचा (FIFA World Cup 2022) थरार रंगला आहे. बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिची लोकप्रियता देश विदेशात आहे. नोरा फतेहीच्या या लोकप्रियतेमुळे तिला कतारमध्ये सुरू असलेल्या FIFA विश्वचषक 2022 मध्ये परफॉर्म करण्याची संधी मिळाली. फिफा विश्वचषक 2022च्या फॅन फेस्टिव्हलमध्ये नोराने जबरदस्त डान्स केला. स्टेजवर तिरंगा फडकवताना नोराने जय हिंदचा नाराही दिला. पण यादरम्यान नोराने एक मोठी चूक केली, ज्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.

नोराने तिरंगा उलटा फडकावला
नोरा फतेहीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये नोरा म्हणते, "भारत फिफा विश्वचषक स्पर्धेत नसेल, पण आम्ही या फेस्टचा एक भाग आहोत. आमच्या संगीतातून, नृत्यातून." नोराचे हे शब्द ऐकून तिथे उपस्थित लोक उत्साहित होतात. नोरासोबतच प्रेक्षकही जय हिंदचा जयघोष करायला सुरूवात करतात. स्टेडियममध्ये इंडिया, इंडिया असे नारे सुरू असतात. नोरा तिरंगा फडकवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. पण यावरून तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. 

नोरा फतेही झाली ट्रोल
नोरावर चुकीच्या पद्धतीने तिरंगा पकडणे आणि फडकावणे तसेच त्याचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. सर्वप्रथम मंचावर फेकून नोराला तिरंगा देण्यात आला. स्टेजवर पडलेला तिरंगा नोरा उचलते आणि एखादा स्कार्फ असल्यासारखे हलवताना दिसली. लक्षणीय बाब म्हणजे नोरा इथेच थांबली नाही आणि तिने चक्क उलटा तिरंगा फडकावण्यास सुरूवात केली. तिरंग्याला स्कार्फ सारखे फिरवले आणि स्वतःभोवती गुंडाळले. स्टेजवरून खाली उभ्या असलेल्या व्यक्तीला नोराने ज्या पद्धतीने तिरंगा परत केला त्यावरून तिच्यावर टीका होत आहे. 

नोरा फतेहीने तिरंगा चुकीचा धरल्याने आणि तो उलटा फडकवल्याने वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरील यूजर्स तिला ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले, तिरंगा चुकीचा पकडला गेला आहे. तर दुसऱ्या यूजरने तिरंगा देण्याची पद्धत अत्यंत चुकीची होती अशा शब्दांत टीका केली आहे. तर काही युजर्संनी नोरा तिरंग्याचा आदर करत नाही असा आरोप केला आहे. युजर्सच्या म्हणण्यानुसार, नोराला तिरंगा कसा फडकावायचा हे देखील माहित नाही. हे अपमानास्पद आहे. नोरा फतेहीच्या या कृत्यामुळे लोक खूप निराश झाले आहेत. मात्र नोरा फतेहीने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Bollywood actress Nora Fatehi is being trolled after she insulted the Indian flag while performing on stage at the FIFA World Cup 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.