हॉटेलमध्ये आलेली चक्कर, लपवलेलं अफेअर, लग्नाआधीच गरोदर होती प्रसिद्ध अभिनेत्री! म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 13:00 IST2025-07-11T12:57:42+5:302025-07-11T13:00:37+5:30

हॉटेलमध्ये आलेली चक्कर, लग्नाआधीच गरोदर राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, अफेअर लपवणं पडलं महागात, म्हणाली...

bollywood actress neha dhupia talk in interview about when she got pregnant before marriage angad bedi | हॉटेलमध्ये आलेली चक्कर, लपवलेलं अफेअर, लग्नाआधीच गरोदर होती प्रसिद्ध अभिनेत्री! म्हणाली...

हॉटेलमध्ये आलेली चक्कर, लपवलेलं अफेअर, लग्नाआधीच गरोदर होती प्रसिद्ध अभिनेत्री! म्हणाली...

Neha Dhupia: बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) ही सगळ्यांची आवडती अभिनेत्री आहे. तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत राहिली आहे.नेहा धुपियाने आजवर 'चुप चुप के', 'तुम्हारी सुलू', 'सिंग इज किंग', 'करीब करीब सिंगल', 'अ थर्सडे' अशा सिनेमांमधून बॉलिवूडमध्ये लोकप्रिय भूमिका साकारल्या आहेत. मात्र, नेहा धुपिया तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत राहिली आहे. २०१८ मध्ये तिने अभिनेता अंगद बेदीसोबत लग्नागाठ बांधून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर काही महिन्यांतच तिने प्रेग्नसीचीं घोषणा केली होती. यावर अभिनेत्री आता भाष्य केलं आहे.

नुकताच नेहा धुपियाने 'द हॉलिवू़ड रिपोर्टर इंडिया' सोबत संवाद साधला. त्यादरम्यान ती म्हणाली, "सोहा अली खान आणि कुणाल खेमू या दोघांना पहिल्यांदा प्रेग्नींसीबद्दल कळालं होतं. त्याचं कारण म्हणजे रेस्टॉरंटमध्ये डिनर करताना मला भोवळ आली होती आणि मी कुणालच्या अंगावर पडले होते. त्यावेळी खूप गोंधळ निर्माण झाला होता. त्यावेळी मी गरोदर आहे हे सोहाला सर्वात आधी कळलं. शिवाय तेव्हा आमचं लग्न झालं नव्हतं आणि अंगद आणि मी एकमेकांना डेट करायला नुकतीच सुरुवातही केली होती."

त्यानंतर अभिनेत्रीने सांगितलं, "आम्ही फक्त काही दिवसांसाठी भेटलो होतो आणि मी त्याला नीट ओळखत नव्हते. त्यामुळे घरच्यांपेक्षा या गोष्टी माझ्या मित्रांसोबत शेअर करणं मला सोयीचं वाटसं,त्यामुळे मी सोहाला सगळं सांगितलं. शिवाय त्या दोघांनाही नुकतंच बाळ झालं होतं. माझ्या पालकांना सांगण्यापेक्षा खूप सोपं होतं. त्यावेळी अनेकांनी विचारलं की, तू प्रेग्नंटआहेस म्हणून लग्न करताय? की तुम्हाला खरंच एकत्र राहायचं आहे." असा किस्सा अभिनेत्रीने शेअर केला. 

नेहाच्या  लग्नाच्या काही महिन्यांनंतर नेहा आणि अंगद नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांची मुलगी मेहरचे जन्म झाला. यानंतर नेहा धुपियाने एका मुलाला जन्म दिला आहे, ज्याचे नाव तिने गुरिक ठेवलं आहे. आता नेहा आणि अंगदला दोन मुलं आहेत. 

Web Title: bollywood actress neha dhupia talk in interview about when she got pregnant before marriage angad bedi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.