"काहीही चूक नव्हती तरीही...", प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला भर सेटवर दिग्दर्शकाने केलेली शिवीगाळ, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 17:23 IST2026-02-09T17:22:49+5:302026-02-09T17:23:59+5:30
"माझी काहीही चूक नसतानाही मला…", भर सेटवर बॉलिवूड अभिनेत्रीला दिग्दर्शकाने केलेली शिवीगाळ, प्रसंग सांगत म्हणाली..

"काहीही चूक नव्हती तरीही...", प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला भर सेटवर दिग्दर्शकाने केलेली शिवीगाळ, म्हणाल्या...
Bollywood Actress: संघर्ष कोणालाच चुकलेला नाही.आयु्ष्यात पाहिजे ती गोष्ट मिळवण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. सर्वसामान्य माणूस असो किंवा एखादा सेलिब्रिटी प्रत्येकाला यातून जावं लागतं. काहींना अगदी करिअरच्या सुरुवातीलाच यश मिळतं तर काहींना वर्षानुवर्ष त्यासाठी मेहनत करावी लागते. बऱ्याचदा या प्रवासात चांगल्या वाईट अनुभवांनाही तोंड द्यावं लागतं.असाच काहीसा अनुभव एका प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला आहे. या अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता आहेत.
नीना गुप्ता हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय असणारं नाव आहे. आपल्या अभिनय कारकीर्दीत त्यांनी 'साथ साथ', 'गांधी', 'जाने भी दो यारों', 'मंडी', 'घर जमाई', 'खलनायक', 'एंथ' आणि 'मेरी बीवी का जवाब नहीं' अशा सुपर-डुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या त्या वध-२ मुळे चर्चेत आल्या आहेत. दरम्यान, दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्ता यांनी त्यांच्या करिअरमध्ये घडलेला एक प्रसंग सांगितला. एका चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकाने त्यांना शिवीगाळ केली होती. Times Now ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की, काही चित्रपटांमध्ये इच्छा नसतानाही काम करणं भाग होतं. आपण आर्थिक अडचणींमुळे त्या भूमिका स्वीकारल्याचं नीना यांनी यावेळी स्पष्ट केलं.
या मुलाखतीमध्ये नीना गुप्ता म्हणाल्या,"तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, पण, एका चित्रपटाच्या सेटवर मला शिव्या देण्यात आल्या आहेत.माझी काहीही चूक नसतानाही मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या गेल्या. चित्रपटाचे दिग्दर्शक माझ्यासोबत तसे वागले. पण, माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मी तिथे अडकले होते. कारण, मला पैसे हवे होते. जर त्यावेळी मला दुसरं काही काम मिळालं असतं तर मी तसं केलंच नसतं."