मेधा शंकर नव्हे तर '12th Fail' साठी 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंती! 'त्या' एका चुकीमुळे हातातून संधी निसटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 15:01 IST2026-04-04T14:10:54+5:302026-04-04T15:01:27+5:30
विक्रांत मेस्सीसोबत '12th Fail' मध्ये मेधाच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री; का नाकारली ऑफर?

मेधा शंकर नव्हे तर '12th Fail' साठी 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंती! 'त्या' एका चुकीमुळे हातातून संधी निसटली
Bollywood Actress: बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी स्टारर आणि विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश डोक्यावर उचलून धरलं होतं. चित्रपटात अभिनेता विक्रांत मेस्सीने आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांची भूमिका साकारली होती. मनोज कुमार यांच्या संघर्षावर बेतलेल्या या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, या चित्रपटात विक्रांत मेस्सीसह अभिनेत्री मेधा शंकर देखील प्रमुख भूमिकेत होती. तिने सिनेमात श्रद्धा जोशी ही भूमिका निभावली. परंतु, तुम्हाला माहितीये का? या भूमिकेसाठी मेधा शंकर आधी दुसऱ्याच एका अभिनेत्रीला ऑफर मिळाली होती. कोण आहे ती जाणून घेऊया...
दरम्यान, ही अभिनेत्री म्हणजे नायला ग्रेवाल आहे. 'इश्क विश्क रीबाउंड', 'थप्पड़' आणि 'बरेली की बर्फी' यांसारख्या चित्रपट आणि सीरिजमधून ती झळकली. शिवाय इम्तियाज अलींच्या ‘तमाशा’मध्ये अभिनेता रणबीर कपूरसोबत नायला ग्रेवाल हिने स्क्रीन शेअर केली होती. सध्या ही अभिनेत्री 'मालाल लीगल है २' या सीरिजमुळे चर्चेत आहे. नुकतीच नायलाने मिड-डे ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सिनेमाच्या प्रवासाविषयी दिलखुलास गप्पा मारल्या.अभिनेत्री नायसला ग्रेवाल ’12th Fail’ सिनेमात झळकणार होती, पण काही कारणणामुळे तिने ही ऑफर नाकारली. त्याचा आजही अभिनेत्रीला पश्चाताप होतो, असं तिने सांगितलं. त्यानंतर तिच्या जागी या सिनेमात अभिनेत्री मेधा शंकरला कास्ट करण्यात आलं.
या मुलाखतीत नायला म्हणाली," तो खूपच चांगला सिनेमा होता. त्यामुळे कास्टिंग कॅालला प्रतिसाद न दिल्याबद्दल मी स्वतःला दोष दिला. मी त्यावेळी दुसरं काहीतरी करत होते आणि काही कारणास्तव ती संधी हातातून निसटून गेली. पण खरं तर, आता माझा नशिबावर खूप विश्वास आहे. ते कास्टिंग अगदी योग्य होतं."
रणबीरसोबत काम करण्याचा अनुभव शेअर करताना म्हणाली….
नायला म्हणाली, “मला एका स्टारसारखं वाटू लागलं. रणबीर कपूर माझा आवडता होता आणि आजही आहे. त्याला माझ्यासमोर प्रत्यक्ष पाहणे ही एका स्टारला भेटल्यासारखी भावना होती आणि मी त्याच्याशी बोलू शकले ही एक अविश्वसनीय गोष्ट होती. जेव्हा तो अभिनय करतो, तेव्हा त्याच्या डोळ्यांतून एक वेगळ्याच पातळीचा प्रामाणिकपणा दिसतो.”