"जबरदस्ती इंटिमेट सीन्स दाखवण्यापेक्षा...",'मैने प्यार किया' फेम भाग्यश्री पटवर्धनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 14:09 IST2026-02-27T14:08:25+5:302026-02-27T14:09:15+5:30
"बोल्डनेस दाखवण्यापेक्षा...",चित्रपटांचं बदलतं स्वरूप पाहून भाग्यश्री पटवर्धन नाराज, म्हणाली-"९० च्या काळात…"

"जबरदस्ती इंटिमेट सीन्स दाखवण्यापेक्षा...",'मैने प्यार किया' फेम भाग्यश्री पटवर्धनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली...
Bhagyashree Patwardhan: १९८९ मध्ये ब्लॉकबस्टर 'मैंने प्यार किया' या पहिल्याच चित्रपटातून स्टारडम मिळविणाऱ्या अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनला कोणत्याही परिचयाची गरज नाही. सलमान खान बरोबरचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, भाग्यश्रीने संपूर्ण सिनेसृष्टीचं लक्ष वेधून घेतलं.चित्रपटाच्या प्रचंड यशामुळे तिला एका रात्रीत स्टारडम मिळालं. त्यानंतर अभिनेत्री इंडस्ट्रीतून १९८९ मध्ये मैने प्यार किया हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तिने हिमालय दसानी यांच्याशी विवाह केला होता. या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर ती इंडस्ट्रीतून गायब झाली. सध्या अभिनेत्री एका मुलाखतीमुळे चर्चेचा विषय बनली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
भाग्यश्रीने २००० च्या दशकाच्या मध्यात 'मां संतोषी मां''हमको दीवाना कर गए' आणि 'रेड अलर्टः द वॉर विदिन'या चित्रपटांद्वारे हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, तिला त्यानंतर करिअरमध्ये पाहिजे तसं यश मिळालं नाही. सध्या अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. अशातच 'व्हॅरायटी इंडिया'ला दिलेल्या एका मुलाखतीत भाग्यश्रीने केलेल्या वक्तव्याने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या मुलाखतीत तिने ९० च्या दशकातील सिनेमे आजच्या सिनेमांमधील फरक सांगितला आहे. आजकालच्या चित्रपटांमध्ये जबरदस्ती इंटिमेट सीन्स दाखवले जातात. खरंतर, याची काही गरजच नाही, असं तिने म्हटलं. दरम्यान, ती म्हणाली, "सिनेमा हे समाजाचं प्रतिबिंब असतं. ९० च्या दशकात सिनेमा हेच मनोरंजनाचं एकमेव माध्यम होतं. कुटुंबासोबत एकत्र बसून लोक सिनेमे पाहायचे. परंतु, आज संपूर्ण चित्र बदललं आहे. कुटुंबे छोटी झाली आहेत. लोक स्वत: मध्येच व्यस्त झाली आहेत आणि क्रिएटिव्ह गोष्टींकडे वळले आहेत."
कुटुंबासोबत एकत्र पाहावेत असे सिनेमे पाहिजेत...
त्यानंतर अभिनेत्री म्हणाली,"खरंतर, आता प्रत्येक रसिकाच्या आवडीनुसार कलाकृती बनवणं कठीण झालं आहे. सिनेमे हे वेगवेगळ्या जॉनरमध्ये विभागले गेले आहेत. सध्या जग बदलतंय पण, असे सिनेमे दाखवणं गरजेचं नाही जे तुम्ही कुटुंबासोब एकत्र बघू शकत नाही. कथा या प्रेक्षकांचा विचारांचा करून कोणताही बोल्डनेस न दाखवता, वेगवेगळ्या पद्धतीने पडद्यावर मांडता येऊ शकतो."असं अभिनेत्रीने सांगितलं.