"त्याक्षणी प्रचंड घाबरले…", लाईव्ह परफॉर्मन्समध्ये माधुरी दीक्षितसोबत घडलेलं असं काही...; म्हणाली-" मी आणि माझी बहीण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 17:04 IST2025-12-03T16:57:35+5:302025-12-03T17:04:00+5:30

"लोकांनी आमच्यावर वस्तू फेकल्या अन्...", लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान धकधक गर्लसोबत घडलेला भयंकर प्रकार, म्हणाली...

bollywood actress madhuri dixit recalls that incident during live performance she scared know the reason  | "त्याक्षणी प्रचंड घाबरले…", लाईव्ह परफॉर्मन्समध्ये माधुरी दीक्षितसोबत घडलेलं असं काही...; म्हणाली-" मी आणि माझी बहीण..."

"त्याक्षणी प्रचंड घाबरले…", लाईव्ह परफॉर्मन्समध्ये माधुरी दीक्षितसोबत घडलेलं असं काही...; म्हणाली-" मी आणि माझी बहीण..."

Madhuri Dixit: बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितची आजही चाहत्यांमध्ये तितकीच क्रेझ आहे. निखळ सौंदर्य आणि सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर तिने हिंदी सिनेसृष्टीत स्वत च हक्काचं स्थान निर्माण केलं. सध्या ही अभिनेत्री तिच्या आगामी 'मिसेस देशपांडे' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. नागेश कुकूनुर दिग्दर्शित ही सीरिज १९ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.याचनिमित्ताने अभिनेत्री विविध ठिकाणी मुलाखती देताना दिसतेय.दरम्यान, अभिनेत्री तिच्या आयुष्यातील आणि अभिनय प्रवासातील काही किस्से शेअर केले.

माधुरी दीक्षित एक उत्तम अभिनेत्री आहेच त्याचबरोबर एक उत्कृष्ट नृत्यांगना म्हणूनही तिच्याकडे पाहिलं जातं. तिने बालपणीच कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं. वयाच्या १० वर्षांपासून माधुरी स्टेज परफॉर्मन्स द्यायला सुरुवात केली होती. नुकत्याच एका अशातच एएनआयला दिलेल्या मुलाखतीतमध्ये तिने एक लाईव्ह परफॉर्मन्स मध्ये घडलेला धक्कादायक प्रसंग शेअर केला आहे.  तेव्हा ती म्हणाली,"मी लहान असतानाच कथ्थकचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती.मी आणि माझ्या बहिणीने अनेक ठिकाणी स्टेज परफॉर्मन्स केला आहे.मात्र, बॉम्बे कल्चरल इव्हेन्टमध्ये काही वेगळंच घडलं.  लोकांनी आमच्यावर वस्तू फेकल्या. पण, आम्ही स्टेज सोडला नाही. जसा परफॉर्मन्स सुरु झाला तसं सगळं काही नॉर्मल झालं. "

मग अभिनेत्रीने सांगितलं," त्यावेळी  अशा कल्चरल इव्हेन्टमध्ये क्लासिकल डान्स केले जायचे नाही. तेव्हा आमचा डान्स सुरु होऊन जवळपास १५ मिनिटं झाली होती. मात्र, काही लोकांमध्ये  नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळालं.त्यामुळे काही लोकांनी तर कागदाचे रॉकेट बनवून स्टेजच्या दिशेने फेकू लागले. त्याक्षणी मी प्रचंड घाबरले होते. पण, माझी बहीण मला म्हणाली, नाही, आपल्याला असं घाबरून चालणार नाही, डान्स करावाच लागेल. त्यानंतर आम्ही परफॉर्मन्स केला." असा किस्सा अभिनेत्री मुलाखतीत सांगितला. 

Web Title : माधुरी दीक्षित का स्टेज डर: लाइव परफॉर्मेंस के दौरान चीजें फेंकी गईं!

Web Summary : माधुरी दीक्षित ने एक भयानक लाइव प्रदर्शन अनुभव को याद किया जहां उन पर और उनकी बहन पर चीजें फेंकी गईं। शुरुआती डर के बावजूद, उनकी बहन ने उन्हें नृत्य जारी रखने के लिए प्रोत्साहित किया, और उन्होंने प्रदर्शन पूरा किया।

Web Title : Madhuri Dixit's stage fright: Objects thrown during live performance!

Web Summary : Madhuri Dixit recounts a terrifying live performance experience where objects were thrown at her and her sister. Despite the initial fear, her sister encouraged her to continue dancing, and they completed the performance.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.