बॉलिवूडवर शोककळा! 'लंबी जुदाई' फेम अभिनेत्री मधु मल्होत्रा यांचं निधन, ७२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 13:30 IST2026-03-15T13:29:42+5:302026-03-15T13:30:20+5:30

बॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय अभिनेत्री मधु मल्होत्रा यांचं निधन झालं आहे. त्या ७२ वर्षांच्या होत्या.

bollywood actress madhu malhotra died at the age of 72 | बॉलिवूडवर शोककळा! 'लंबी जुदाई' फेम अभिनेत्री मधु मल्होत्रा यांचं निधन, ७२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलिवूडवर शोककळा! 'लंबी जुदाई' फेम अभिनेत्री मधु मल्होत्रा यांचं निधन, ७२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय अभिनेत्री मधु मल्होत्रा यांचं निधन झालं आहे. त्या ७२ वर्षांच्या होत्या. शुक्रवारी(१३ मार्च) त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मधु मल्होत्रा यांनी अभिनय आणि सौंदर्याने ८०-९०चं दशक गाजवलं. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं. सिनेमात त्या कधीच मुख्य भूमिका साकारताना दिसल्या नाहीत. पण अनेक सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी निभावल्या. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमधून शोक व्यक्त केला जात आहे. 

मधु मल्होत्रा यांच्या निधनावर सुभाष घई यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. "त्या एक विनम्र महिला होत्या", असं म्हणत सुभाष घई मधु मल्होत्रा यांच्या आठवणीत भावुक झाले. मधु मल्होत्रा यांना लंबी जुदाई या गाण्यामुळे प्रसिद्धी मिळाली होती. सुभाष घई यांनीच त्यांचं कास्टिंग केलं होतं. १९८३ साली प्रदर्शित झालेल्या हीरो या सिनेमातील हे गाणं होतं. या सिनेमात जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री मुख्य भूमिकेत होते. 

मधु मल्होत्रा यांचे सिनेमे! 

मधु मल्होत्रा यांनी १९७५ साली प्रदर्शित झालेल्या 'अंधेरा' या हॉरर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये त्या झळकल्या. पण, १९७९ मध्ये आलेल्या 'द ग्रेट गॅम्बलर' या अॅक्शन सिनेमाने त्यांना मोठा ब्रेक मिळवून दिला होता. 'विश्वनाथ', 'कर्ज', 'विधाता' या सिनेमांमध्ये त्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. २००० मध्ये प्रदर्शित झालेला 'वो बेवफा थी' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

Web Title : 'लंबी जुदाई' फेम अभिनेत्री मधु मल्होत्रा का 72 वर्ष की आयु में निधन

Web Summary : 'लंबी जुदाई' से मशहूर अभिनेत्री मधु मल्होत्रा का 72 वर्ष की आयु में मुंबई में निधन हो गया। उन्होंने 80 और 90 के दशक की कई फिल्मों में सहायक भूमिकाएँ निभाईं। सुभाष घई ने उनके निधन पर शोक व्यक्त किया और उनकी विनम्रता को याद किया। उन्होंने 'अंधेरा' (1975) से शुरुआत की, और 'द ग्रेट गैम्बलर' एक महत्वपूर्ण फिल्म थी।

Web Title : 'Lambi Judai' Fame Actress Madhu Malhotra Passes Away at 72

Web Summary : Veteran actress Madhu Malhotra, known for 'Lambi Judai', passed away in Mumbai at 72. She acted in numerous films from the 80s and 90s, often in supporting roles. Subhash Ghai mourned her death, remembering her humility. Her debut was in 'Andhera' (1975), with 'The Great Gambler' marking a breakthrough.