वयाच्या ३७ व्या वर्षी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:35 IST2025-06-20T12:34:49+5:302025-06-20T12:35:31+5:30

बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेल्या लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या बॉयफ्रेंडसोबत गुपचुप लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे सर्वांनी तिचं अभिनंदन केलं आहे

Bollywood actress Lauren Gottlieb at the age of 37 at italy with boyfriend | वयाच्या ३७ व्या वर्षी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

वयाच्या ३७ व्या वर्षी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

हिंदी सिनेविश्वातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री लॉरेन गोटिलेब विवाहबंधनात अडकली आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी लॉरेनने इटलीमध्ये गुपचुप लग्न केलं आहे. लॉरेनच्या लग्नाचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ११ जून रोजी इटली येथील टस्कनी भागात लॉरेनने जवळचे नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींच्या साहाय्याने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं आहे. लॉरेनने गेल्या वर्षी २०२४ मध्ये साखरपुड्याची घोषणा केली होती.

लॉरेनच्या लग्नाची चर्चा

अभिनेत्री लॉरेनने काही दिवसांपूर्वी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला. लंडनमधील प्रसिद्ध व्हिडीओ क्रिएटर टोबियास जोन्ससोबत लॉरेनने आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. यावेळी लग्नाविषयी बोलताना लॉरेन्स म्हणाली, "माझ्यासाठी हे सगळं एका स्वप्नासारखं आहे. शांत चालणाऱ्या आयुष्यात अचानक आश्चर्याचा क्षण यावा, तशी ही गोष्ट आहे." लॉरेनने ABCD या लोकप्रिय बॉलिवूड सिनेमात काम केलं आहे. रेमा डिसूजाने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.


लॉरेनने ख्रिश्चन परंपरेनुसार टोबियाससोबत लग्न केलं. व्हायरल फोटोंमध्ये पाहायला मिळतं की, लॉरेनने शोल्डर डीप कट असलेला पांढऱ्या रंगाचा गाउन परिधान केला आहे. लॉरेनच्या या गाउनवर पांढऱ्या रंगाच्या मोतींची डिझाईन केलेली दिसते. तर दुसरीकडे टोबियासने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा टक्सीडो परिधान केला आहे. या दोघांनी गेल्या वर्षी साखरपुडा केला होता. लॉरेनच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच बॉलिवूड सेलिब्रिटींनी आणि तिच्या चाहत्यांनी लग्नासाठी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Bollywood actress Lauren Gottlieb at the age of 37 at italy with boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.