क्रिती सनॉन १० वर्षांनी लहान बिझनेसमनला करतेय डेट? 'त्या' चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन, लग्नाबद्दल म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:33 IST2025-11-14T12:28:31+5:302025-11-14T12:33:17+5:30

"एका पार्टीमध्ये आम्ही...", रिलेशनशिपच्या चर्चांवर क्रिती सनॉन स्पष्ट बोलली

bollywood actress kriti sanon talks about dating rumours with kabir bahia says | क्रिती सनॉन १० वर्षांनी लहान बिझनेसमनला करतेय डेट? 'त्या' चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन, लग्नाबद्दल म्हणाली...

क्रिती सनॉन १० वर्षांनी लहान बिझनेसमनला करतेय डेट? 'त्या' चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन, लग्नाबद्दल म्हणाली...

Kriti Sanon: अभिनेत्री क्रिती सनॉन ही बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं तिच्या १० वर्षांच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केलंय. मात्र, मागील काही महिन्यांपासून क्रिती सेनॉन तिच्या लव्ह लाईफमुळे प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्रीचं नाव प्रसिद्ध उद्योजक कबीर बहियासोबत जोडले जात आहे. अनेकदा दोघं एकत्र दिसले असले तरी त्यांनी त्यांच्या नात्याविषयी उघडपणे कधीच काही सांगितलं नाही. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिचा रिलेशनशिप स्टेटस आणि या सर्व चर्चांवर मौन सोडलं आहे.

अलिकडेच क्रितीने काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या चॅट शो 'टू मच विथ काजोल अॅंड ट्विंकल' मध्ये हजेरी लावली. यावेळी विकी कौशल देखील तिच्यासोबत पाहायला मिळाला. या मुलाखतीत दोघांनीही त्यांच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यावर भाष्य केलं. दरम्यान, मुलाखतीत ट्विंकल खन्नाने क्रितीला यावेळी थेट प्रश्न विचारला की, तुझा लेटेस्ट क्रश कोण आहे. पहिल्यांदा क्रिती थोडी लाजली. त्यानंतर उत्तर देत म्हणाली, "ही अशी व्यक्ती आहे ज्याचा इंडस्ट्रीशी कोणताही संबंध नाही. "

यावेळी कृतीने त्या व्यक्तीचं नाव घेतलं नाही. शिवाय या विषयावर बोलणं टाळलं. मात्र, लग्नाबद्दल तिने भाष्य केलं. क्रिती म्हणाली," माझ्या लग्नाबद्दल इंडस्ट्रीत ज्या चर्चा होत आहेत. पसरवल्या जातायत त्यात काहीच तथ्य नाही. या निव्वल अफवा आहेत.मी यावर्षी लग्न करतेय वगैरे हे खरं नाही. त्यानंतर अभिनेत्री खळखळून हसू लागली." मी एका व्यक्तीला पार्टीमध्ये भेटले होते. आमच्यासाठी बऱ्याच गोष्टी नवीन आहेत." अभिनेत्रीचं हे वक्तव्य ऐकून ती व्यक्ती म्हणजे कबीर बहिया असणार, असे तर्क-वितर्क चाहते लावत आहेत.

कबीर बहियाला डेट करण्याच्या आणि लग्नाच्या चर्चांवर क्रिती सेनॉनने आता पूर्णविराम लावला आहे. अशाप्रकारच्या चर्चांवर नेहमीच कमीत कमी प्रतिक्रिया देत असल्याचं यावेळी क्रितीने स्पष्ट केलं.

Web Title: bollywood actress kriti sanon talks about dating rumours with kabir bahia says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.