"मी २ हजारांपेक्षा जास्त किमतीचे...", कपड्यांवर खर्च करण्याबाबत मृणाल ठाकूरने मांडलं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 01:13 PM2024-04-04T13:13:51+5:302024-04-04T13:16:32+5:30

मृणाल ठाकूर हे नाव हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर येतं.

bollywood actress jersey fame mrunal thakur says she avoid to spend more than 2000 rs on clothes  | "मी २ हजारांपेक्षा जास्त किमतीचे...", कपड्यांवर खर्च करण्याबाबत मृणाल ठाकूरने मांडलं स्पष्ट मत

"मी २ हजारांपेक्षा जास्त किमतीचे...", कपड्यांवर खर्च करण्याबाबत मृणाल ठाकूरने मांडलं स्पष्ट मत

Mrunal Thakur :  मृणाल ठाकूर हे नाव हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या च्या यादीत अव्वल स्थानावर येतं. छोट्या पडद्यावरील 'मुझसे कुछ कहती...ये खामोशिया' तसेच 'कुमकुम भाग्य' या मालिकांमधून काम करत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. साऊथ तसेच हिंदी मनोरंजन विश्वात मृणालने आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहे.

'सीता रामम' तसेच 'हाय नन्ना' यांसारख्या तेलगू चित्रपटांमध्ये तिने केलेल्या कामाची सर्वत्र स्तुती करण्यात आली. सध्या अभिनेत्री तिने एका मुलाखती दरम्यान केलेल्या विधानामुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत मृणाल आपल्या कपड्यांवर साधारण किती खर्च करते? याबाबत तिने खुलासा केलाय. 

मृणाल म्हणते, ''कपडे खरेदी करणं म्हणजे मला एक वायफळ खर्च वाटतो. तसेच आतापर्यंत मी २,००० हजारांपेक्षा जास्त किंमतीचे कपडे कधीच खरेदी केले नाहीत. शिवाय मी डिझायनर कपड्यांवरती जास्त खर्च करत नाही. कारण हे कपडे पुन्हा वापरता येत नाहीत, त्यामुळे मला कपड्यांवरती वायफळ खर्च करणं आवडत नाही'', असं देखील ती म्हणाली. 

सध्या अभिनेत्री मृणाल ठाकूर 'फॅमिली स्टार' या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. साऊथ स्टार विजय देवरकोंडासोबत तिने या सिनेमात स्क्रिन शेअर केली आहे. अल्पावधीतच  'फॅमिली स्टार' टिझरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहयला मिळतंय.५ एप्रिलला हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे या सिनेमात विजयला अ‍ॅक्शन तसंच विनोदी अंदाजात बघायला त्याचे फॅन्स नक्कीच उत्सुक आहेत. 

Web Title: bollywood actress jersey fame mrunal thakur says she avoid to spend more than 2000 rs on clothes 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.