हातात हात घेतला, प्रेमाने चौकशी केली! जान्हवी कपूर पहिल्यांदाच दिसली सुशीलकुमार शिंदेंच्या कुटुंबासोबत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:40 IST2025-09-23T13:26:28+5:302025-09-23T13:40:27+5:30

जान्हवी कपूरच्या 'होमबाउंड'च्या प्रिमिअरला सुशीलकुमार शिंदेंसह कुटुंबियांची हजेरी, होतेय चर्चा  

bollywood actress janhvi kapoor rumored boyfriend shikhar pahariya family attend homebound movie special screening video viral | हातात हात घेतला, प्रेमाने चौकशी केली! जान्हवी कपूर पहिल्यांदाच दिसली सुशीलकुमार शिंदेंच्या कुटुंबासोबत!

हातात हात घेतला, प्रेमाने चौकशी केली! जान्हवी कपूर पहिल्यांदाच दिसली सुशीलकुमार शिंदेंच्या कुटुंबासोबत!

Janhvi Kapoor:बॉलिवूडची परमसुंदरी म्हणजेच अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या चर्चेत आली आहे. नुकताच तिची मुख्य भूमिका असलेला 'होमबाउंड' चित्रपटाला ऑस्करच्या शर्यतीत स्थान मिळालं आहे. भारताकडून या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म कॅटेगरीमध्ये ऑस्करसाठी निवड  करण्यात आली आहे. येत्या २६ सप्टेंबरपासून हा बहुचर्चित चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे. अशातच नुकतंच होमबाउंड चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग पर पडलं. यादरम्यानचा जान्हवी कपूरचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय. 

नुकंतच जान्हवी कपूर, ईशान खट्टर आणि विशाल जेठवाची मुख्य भूमिका असलेल्या होमबाउंट चित्रपटाचं स्क्रिनिंग पार पडलं. याचा व्हिडीओ फिल्मीग्यान च्या इनस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे व्हिडीओमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी त्यांच्या कुटुंबीयांसह हजेरी लावली. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की जान्ही अगदी प्रेमाने शिंदे कुटुंबीयांची चौकशी करताना दिसतेय. शिवाय सुशीलकुमार शिंदेंच्या पत्नी यांचा हातात हात घेऊन फोटोशूट करताना दिसते आहे. सध्या सोशल मीडियावर जान्हवीचा हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. 

जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पाहारिया हा सुशील कुमार शिंदेंचा नातू आहे. सुशील कुमार शिंदेंची मुलगी स्मृती शिंदे यांचा तो मुलगा आहे. गेली १५-१६ वर्षांपासून  जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत आहेत.शिवाय अनेक ठिकाणी त्यांना स्पॉटही करण्यात आलं आहे. जान्हवी आणि शिखर यांचं एकाच शाळेत शिक्षण झालं आहे. त्यामुळे शाळेपासूनच दोघं एकमेकांना ओळखतात. लवकरच दोघे लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे.त्यामुळे जान्हवी कपूर शिंदे कुटुंबीयांची सून होणार का? या चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत.

Web Title: bollywood actress janhvi kapoor rumored boyfriend shikhar pahariya family attend homebound movie special screening video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.